ह्या क्षेत्राला पुढील दोन वर्षांसाठी नवीन आयफोन SE भाडेतत्त्वावर घेता येईल आणि त्याचबरोबर इतर आयफोन आणि आयपॅडही कॉर्पोरेट क्षेत्राला भाडेतत्वावर देणे सुरु होईल.
भारतातील कॉर्पोरेट्स क्षेत्रासाठी अॅप्पल एक नवीन स्कीम चालू केली आहे. ह्या योजनेअंतर्गत ह्या क्षेत्रातील लोकांना नवीन अायफोन SE 16GB भाडेतत्त्वावर घेता येईल. दोन वर्षांसाठी ह्याचे भाडे प्रति महिना ९९९ रुपये असेल. तसेच अॅप्पल कंपनी आयफोन 6 16GB आणि आयफोन 6S 16GB हेदेखील अनुक्रमे १,११९ रुपये आणि १,३९९ रुपये प्रति महिन्याप्रमाणे भाडेतत्वावर देण्याची योजना बनवित आहे. त्यात भर म्हणून कंपनीने अशीही घोषणा केली आहे की, लवकरच ती इतर सर्व आयफोन आणि आयपॅडही कॉर्पोरेट क्षेत्रालाही भाडेतत्वावर देणे सुरु करेल.
२१ मार्चला अॅप्पलच्या एका कार्यक्रमात आयफोन SE ची घोषणा करण्यात आली आण ८ एप्रिल आयफोन SE तसेच ९.७ इंचाचा आयपॅड प्रो भारतात लाँच झाला. 16GB च्या आयफोन SE ची किंमत ३९,००० रुपये आणि 64GB वेरियंटची किंमत ४९,००० रुपये आहे. आयफोन SE मध्ये 4 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्यात आपल्याला 12MP चा isight (रियर) कॅमेरा 4K व्हिडियो सपोर्ट मिळत आहे, त्याशिवाय आयफोन SE मध्ये 1.2MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात अॅप्पल सपोर्टसह एक फिंगरप्रिंट सेसरसुद्धा मिळत आहे.