मोबाईल निर्माता कंपनी कूलपॅड लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन नोट ३ लाइट सादर करेल. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ह्या स्मार्टफोनला १५ जानेवारीला नवी दिल्लीत लाँच करु शकते. कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोन आता हल्लीच लाँच झालेल्या नोट ३ चे नवीनतम व्हर्जन आहे.
ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे. अलीकडेच आलेल्या काही लीक्सनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असू शकतो, ज्याच्या माध्यमातून ह्या स्मार्टफोनला लॉक आणि अनलॉक अगदी सहजपणे केले जाऊ शकते.
कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोनविषयी काही लीक्समध्ये माहिती दिली आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले असू शकते, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल असू शकतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन मिडियाटेक कंपनी MT6753 64 बिट प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज असू शकतो. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
लीक्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन असू शकतो, जो अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करणारा असेल. नोट 3 लाइट 2500mAh च्या बॅटरीसह येऊ शकतो.