आता कोणत्याही रजिस्ट्रेशनशिवाय अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा कूलपॅड नोट 3 लाइट
मंगळवारपासून कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोन Amazon.in वर ओपन सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. आणि हा सेल तोपर्यंत चालेल जो पर्यंत ह्याचा स्टॉक संपत नाही.
कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोन Amazon.in वर ओपन सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. आणि हा सेल तोपर्यंत चालेल जो पर्यंत ह्याचा स्टॉक संपत नाही. ह्या स्मार्टफोनला आपण ह्या साइटवर ६,९९९ रुपयात खरेदी करु शकता.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक कंपनी MT6735 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम ड्यूल 4G स्मार्टफोन आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, ब्लूटुथ 4.0, वायफाय आणि मायक्रो-USB फीचर्स समाविष्ट आहेत. ह्या स्मार्टफोनमध्ये 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीनुसार, हा 10 तासांचा टॉकटाइम आणि २०० तासांचा स्टँडबाय वेळ देतो. ह्यात एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि डिजिटल कंपास दिले गेले आहे.
हेदेखील वाचा – ४ इंचाचा डिस्प्ले असलेला आयफोन SE अखेर लाँच
हेदेखील वाचा – ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास