मोबाईल निर्माता कंपनी कूलपॅडने भारतात आपला नवीन स्मार्टफोन नोट 3 लाइट लाँच केला आहे. हा स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. कंपनीच्या ह्या स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन एक्सक्लुसिवरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल.
कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोनची विक्री फ्लॅश सेलच्या माध्यमातून केली जाईल, ज्याला २८ जानेवारीपासून दुपारी २ वाजता आयोजित केले जाईल. त्यासाठी रजिस्ट्रेशन शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरु होईल.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक कंपनी MT6735 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम ड्यूल 4G स्मार्टफोन आहे.