वॉटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला Coolpad Cool 3 स्मार्टफोन, किंमत Rs 5,999

Updated on 06-Feb-2019
HIGHLIGHTS

Coolpad Cool 3 स्मार्टफोन 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि डिवाइसची किंमत Rs 5,999 ठेवण्यात आली आहे.

Coolpad ने भारतात आपला अजून एक स्मार्टफोन Coolpad Cool 3 लॉन्च केला आहे. चांगले यश मिळवल्यानंतर चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी काही काळ भारतातून गायब झाली होती आणि आता आपल्या Coolpad Cool 3 स्मार्टफोनच्या लॉन्च मुळे कंपनी पुन्हा एकदा भारतीय बाजारात एक प्रसिद्ध बजेट स्मार्टफोनच्या रूपात वर येण्याचा प्रयत्न करत आहे.

Cool 3 ची मोठी खासियत याचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि एंट्री-लेवल किंमतीत डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा या किंमतीती येणार पहिला फोन आहे जो एंड्राइड 9.0 पाई आउट-ऑफ-द बॉक्स सह येईल. हा स्मार्टफोन डुअल कलर ग्लॉसी बॅक सह सादर केला गेला आहे ज्याच्या किनाऱ्यांवर रंगांचा नवा पॅटर्न बघायला मिळतो.

Coolpad ग्रुपचे प्रेसिडेंट Fisher Yuan म्हणाले कि, “Coolpad भारतात बजेट सेगमेंट मध्ये स्टाइलिश डिजाइन, चांगले स्पेक्स आणि क्वालिटी फोन्स आणेल. आम्ही ग्राहकांना चांगला अनुभव देऊ इच्छित आहोत आणि यावर्षी आम्ही भारतात आमची उपस्थिती दाखवण्यासाठी किफायती स्मार्टफोन्सची रेंज ऑफर करू.”

Coolpad Cool 3 चे स्पेसिफिकेशंस

Coolpad Cool 3 मध्ये 5.71 इंचाचा फुल विजन HD+ डिस्प्ले मिळत आहे ज्याच्या वरच्या बाजूला एक ड्यूड्रॉप नॉच मिळत आहे. हा हँडसेट Unisoc च्या लेटेस्ट चिपसेट द्वारा संचालित आहे जो AI आणि AR/VR क्षमतांसह येतो. Unisoc याआधी Spreadtrum या नावाने प्रसिद्ध होती. हा स्मार्टफोन 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज सह येतो जी माइक्रो SD कार्डच्या मदतीने वाढवता येते.

ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर Coolpad 3 मध्ये 8 आणि 0.3 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा मिळत आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो अनेक ब्यूटी एनहांसमेंट मोड्स सह येतो. हा फोन 3000mAh च्या बॅटरी सह येतो आणि डिवाइस मध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

Coolpad Cool 3 ची किंमत

Coolpad Cool 3 ची किंमत Rs 5,999 आहे. हा डिवाइस 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज सह येईल. हा स्मार्टफोन ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे विकत घेता येईल. हा स्मार्टफोन चार ग्रेडिएंट कलर्स मध्ये उपलब्ध होईल ज्यात मिडनाईट ब्लू, रूबी ब्लॅक, ओशन इंडिगो आणि टील ग्रीन चा समावेश आहे.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :