स्पेक्सची तुलना: Oppo K1 विरुद्ध Moto G7 Power

स्पेक्सची तुलना: Oppo K1 विरुद्ध Moto G7 Power
HIGHLIGHTS

आज आम्ही Oppo K1 ची तुलना Moto G7 सोबत करणार आहोत जी स्पेक्स, फीचर्स आणि किंमतीवर आधारित असेल.

अलीकडेच Motorola ने आपल्या मोटो G सीरीज लाइन अप ची घोषणा केली आहे ज्यात Moto G7, Moto G7 Power, Moto G7 Plus आणि Moto G7 Play यांचा समावेश आहे. या चारही डिवाइसेस मध्ये Moto G7 Power च आतापर्यंत भारतात अधिकृतपणे समोर आला आहे. तर दुसरीकडे आमच्याकडे Oppo चा लेटेस्ट K1 डिवाइस आहे ज्याची किंमत भारतात 20,000 रुपयांचा आत आहे आणि सध्या हा मार्केट मधील सर्वात किफायतीशीर फोन आहे ज्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. जर तुम्ही हे दोन्ही फोन्स विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत कि तुमच्यासाठी कोणता डिवाइस असू शकतो चांगला.

चला तर या दोन्ही फोन्सची तुलना यांच्या डिस्प्ले पासून सुरु करूया. Oppo K1 मध्ये तुम्हाला 6.4 इंचाचा FHD+ डिस्प्ले 2340 x 1080 पिक्सेल रेसोल्यूशन सह मिळतो. डिस्प्ले मध्ये तुम्हाला ड्यू-ड्रॉप नॉच फ्रंटला मिळत आहे ज्यामुळे तुम्हाला जास्त व्यू एरिया मिळतो. तसेच दुसरीकडे Moto G7 Power मध्ये तुम्हाला 6.2 इंचाची छोटी स्क्रीन 1570 x 720 पिक्सेल रेसोल्यूशन सह मिळते.

परफॉरमेंस बद्दल बोलायचे तर Motorola च्या Moto G7 Power मध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 632 प्रोसेसर मिळतो ज्यात तुम्हाला 1.8GHz चा सपीयू मिळत आहे. तर दुसरीकडे Oppo K1 Qualcomm Snapdragon 660 प्रोसेसर ने सुसज्ज आहे जो Moto G7 Power मध्ये देण्यात आलेल्या Qualcomm Snapdragon 632 पेक्षा जास्त फास्ट आहे. दोन्ही डिवाइस 4GB RAM आणि 64GB इंटरनल मेमरी सह येतात.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर हि आश्चर्यकारक बाब आहे कि मोटोरोला ने यात 13MP चा सेंसर मागील बाजूस दिला आहे आणि 8MP यूनिट फ्रंटला दिला आहे. पण इतर कंपन्या आपल्या बजेट फोन मध्ये कमीत कमी ड्यूल सेटअप कॅमेरा देत आहेत. पण या फोनची कॅमेरा खासियत किंवा क्वॉलिटी यात देण्यात आलेल्या लेंसच्या संख्येवर आधारित नसते. Oppo K1 मध्ये एक 25MP फ्रंट कॅमेरा सेल्फी साठी आणि ड्यूल 16MP + 2MP रियर कॅमेरा उपलब्ध आहेत.

Oppo K1 फोन भारतात 16,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे तसेच तुम्ही Motorola G7 Power 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo