लेनोवो बाजारात आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन आहे लेनोवो Zuk Z1. हा भारतातील पहिला सायनोजेन ओएसवर चालणारा स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत १३,४९९ रुपये आहे आणि हा स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेंसर आणि आकर्षक स्पेक्ससह लाँच केला गेला आहे. त्याशिवाय भारतात सॅमसंगने आपला एक नवीन स्मार्टफोन J5 (2016) लाँच केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स किंमतीच्या बाबतीत सारखेच आहेत. मात्र ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये कोणता स्मार्टफोन चांगला आहे हे पाहणे तितकेच अवघड आहे. चला तर मग माहित करुन घेऊयात ह्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेक्सविषयी….
डिस्प्ले
लेनोवो Zuk Z1: 5.5 इंच FHD डिस्प्ले
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 5.2 इंच HD डिस्प्ले
प्रोसेसर
लेनोवो Zuk Z1: क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 1.2GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410
लेनोवो Zuk Z1: सायनोजेनवर आधारित अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो
रॅम
लेनोवो Zuk Z1: 3GB
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 2GB
स्टोरेज
लेनोवो Zuk Z1: 64GB
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 16GB
कॅमेरा
लेनोवो Zuk Z1: 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी
लेनोवो Zuk Z1: 4100mAh
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 3100mAh
फिंगरप्रिंट सेंसर
लेनोवो Zuk Z1 : फिंगरप्रिंट सेंसर आहे.
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): फिंगरप्रिंट सेंसर नाही, पण S बाइक मोड आहे.
किंमत
लेनोवो Zuk Z1 : १३,४९९ रुपये
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): १३,९९० रुपये
हेदेखील वाचा – लवकरच आपल्याला मिळणार “मेड इन इंडिया” आयफोन्स?
हेदेखील वाचा – १३ मेगापिक्सेलच्या कॅमे-याने सुसज्ज आहे लेनोवो ZUK Z1 स्मार्टफोन