CMF Phone 1 येत्या 8 जुलै रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे.
कंपनी CMF Buds Pro 2 आणि CMF Watch Pro 2 देखील लाँच करणार आहे.
आगामी CMF Phone 1 अंदाजे 20,000 रुपयांच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो.
CMF Phone 1: Nothing च्या सब-ब्रँड CMF ने आपला पहिला फोन लाँच करण्याची पूर्ण तयारी केली आहे. बऱ्याच कालावधीपासून CMF Phone 1 परवडणाऱ्या किमतीत भारतात दाखल होईल, असे सांगितले जात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा स्मार्टफोन येत्या 8 जुलै रोजी लाँच होणार आहे. एवढेच नाही तर, CMF फोन 1 सोबत कंपनी CMF Buds Pro 2 आणि CMF Watch Pro 2 देखील लाँच करणार आहे. दरम्यान लाँच पूर्वीच CMF Phone 1 ची किंमत लीक झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात CMF Phone 1ची अपेक्षित किंमत-
प्रसिद्ध टिपस्टर Yogesh Brar यांनी CMF Phone 1 च्या किमतीबद्दल आपल्या अधिकृत X अकाउंटवर माहिती दिली आहे. आगामी CMF Phone 1 अंदाजे 20,000 रुपयांच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार फोनची किंमत 15,999 रुपये आणि 17,999 रुपये असू शकते. परंतु टिपस्टरचे म्हणणे आहे की, ही किंमत फोनची किरकोळ किंमत नसून सवलतीनंतरची किंमत आहे. CMF Phone 1 ची खरी किंमत हा स्मार्टफोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.
CMF Phone 1 चे लीक तपशील
किमतीबरोबरच, X वरील सुप्रसिद्ध टिपस्टर Yogesh Brar यांनी केलेले ट्विट पाहिल्यास लक्षात येते की-
CMF Phone 1 स्मार्टफोन 6.7-इंच लांबीच्या FHD AMOLED डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटवर काम करेल.
लीकनुसार, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर असू शकतो. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी असण्याचीही अपेक्षा आहे.
स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, लीकनुसार या फोनमध्ये 256GB पर्यंत स्टोरेज असण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हे स्टोरेज वाढवायचे असेल तर तुम्ही ते सहज वाढवू शकता. यासाठी तुम्हाला मायक्रो SD कार्ड आवश्यक असणार आहे.
कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, CMF Phone 1 फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असू शकतो, या कॅमेरामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर देखील असेल. या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देखील असणार आहे.
फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी असण्याचीही अपेक्षा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.