आगामी CMF Phone 1 च्या लाँचपूर्वीच Price Leak! जाणून घ्या कंपनीच्या पहिल्या स्मार्टफोनची अपेक्षित किंमत
CMF Phone 1 येत्या 8 जुलै रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे.
कंपनी CMF Buds Pro 2 आणि CMF Watch Pro 2 देखील लाँच करणार आहे.
आगामी CMF Phone 1 अंदाजे 20,000 रुपयांच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो.
CMF Phone 1: Nothing च्या सब-ब्रँड CMF ने आपला पहिला फोन लाँच करण्याची पूर्ण तयारी केली आहे. बऱ्याच कालावधीपासून CMF Phone 1 परवडणाऱ्या किमतीत भारतात दाखल होईल, असे सांगितले जात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा स्मार्टफोन येत्या 8 जुलै रोजी लाँच होणार आहे. एवढेच नाही तर, CMF फोन 1 सोबत कंपनी CMF Buds Pro 2 आणि CMF Watch Pro 2 देखील लाँच करणार आहे. दरम्यान लाँच पूर्वीच CMF Phone 1 ची किंमत लीक झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात CMF Phone 1ची अपेक्षित किंमत-
Also Read: अप्रतिम ऑफर! OnePlus Nord CE4 Lite 5G ची भारतात आज पहिली सेल, 50MP कॅमेरासह मिळतील भारी फीचर्स
CMF Phone 1 ची लीक किंमत
After seeing OnePlus Nord CE4 Lite pricing, I think POCO X6 is a much better buy
— Yogesh Brar (@heyitsyogesh) June 26, 2024
For Rs 18,999, it gets you
– Better SoC (Snapdragon 7s Gen 2)
– Better cameras
– Excellent build quality
– Double the storage
– Cherry on top is the near bezel less display
What are your thoughts?
प्रसिद्ध टिपस्टर Yogesh Brar यांनी CMF Phone 1 च्या किमतीबद्दल आपल्या अधिकृत X अकाउंटवर माहिती दिली आहे. आगामी CMF Phone 1 अंदाजे 20,000 रुपयांच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार फोनची किंमत 15,999 रुपये आणि 17,999 रुपये असू शकते. परंतु टिपस्टरचे म्हणणे आहे की, ही किंमत फोनची किरकोळ किंमत नसून सवलतीनंतरची किंमत आहे. CMF Phone 1 ची खरी किंमत हा स्मार्टफोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.
CMF Phone 1 चे लीक तपशील
किमतीबरोबरच, X वरील सुप्रसिद्ध टिपस्टर Yogesh Brar यांनी केलेले ट्विट पाहिल्यास लक्षात येते की-
- CMF Phone 1 स्मार्टफोन 6.7-इंच लांबीच्या FHD AMOLED डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटवर काम करेल.
- लीकनुसार, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर असू शकतो. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी असण्याचीही अपेक्षा आहे.
CMF Phone 1
— Yogesh Brar (@heyitsyogesh) June 26, 2024
– 6.7" FHD+ AMOLED, 120Hz
– MediaTek Dimensity 7300 SoC
– 50MP + depth sensor
– 16MP selfie
– in-display FP
– 6/128GB , 8/128GB
– 2TB expandable via microSD
– 5,000mAh battery, 33W charging
– Android 14
Pricing:
Rs 15,999 & Rs 17,999 (discounted)
Thoughts on this?
- स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, लीकनुसार या फोनमध्ये 256GB पर्यंत स्टोरेज असण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हे स्टोरेज वाढवायचे असेल तर तुम्ही ते सहज वाढवू शकता. यासाठी तुम्हाला मायक्रो SD कार्ड आवश्यक असणार आहे.
- कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, CMF Phone 1 फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असू शकतो, या कॅमेरामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर देखील असेल. या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देखील असणार आहे.
- फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी असण्याचीही अपेक्षा आहे.
Tags: CMF Phone 1CMF Phone 1 cameraCMF Phone 1 detailsCMF Phone 1 in indiaCMF Phone 1 launchCMF Phone 1 launch dateCMF Phone 1 leaksMARATHIMARATHI NEWSMARATHI TECH NEWS
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile