सोलर पॉवर किटची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते कुठेही सहज कॅरी करता येईल.
बरेचदा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आपली उपकरणे अर्थातच आपला स्मार्टफोन चार्ज करण्यात अडचण येते. त्यामुल्ले आपली कामे वेळेवर होत नाहीत. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी सोलर इमर्जन्सी किट खरेदी करावी. ज्याच्या मदतीने वापरकर्ते विजेशिवाय त्यांचे मोबाईल चार्ज करू शकतील. तसेच पॉवर बँक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवण्यास सक्षम असतील.
या सोलर पॉवरची किंमत 299 रुपयांपासून सुरू होते आणि जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत जाते. मात्र, 299 रुपयांचे सोलर चार्जिंग सिस्टम ओपन मार्केटमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सोलर मोबाईल चार्जरची किंमत जास्त असू शकते. चला तर मग वेळ न घालवता सोलर मोबाईल चार्जर्स बघुयात…
electroprime 6V 4.2W सोलर पॉवर चार्जर
हा सोलर मोबाईल चार्जर 4.2W एनर्जी निर्माण करतो. त्यामुळे मोबाईल फास्ट स्पीडमध्ये चार्ज होतो.
ESPtronics सोलर पॅनेल मोबाईल चार्जर किट
हा सोलर मोबाईल चार्जर आहे. यात मायक्रो USB कनेक्टर, क्रोकोडाइल चिप, फॅन, बजर आणि डीसी मोटरसह LED लाईट आहे. याच्या मदतीने तुम्ही फास्ट स्पीडमध्ये मोबाईल चार्ज करू शकता.
या सोलर पॉवर किटची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते कुठेही सहज कॅरी करता येईल. जर तुम्ही पर्वत किंवा अशा कोणत्याही ठिकाणाला भेट देत असाल जेथे वीज पुरवठा समस्या आहे, तुम्ही हे सोलर पॉवर किट तिथे घेऊ शकता आणि मोबाईल चार्ज करू शकतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.