सेलकॉन डायमंड 4G प्लस स्मार्टफोनमध्ये आहे 8GB चे अंतर्गत स्टोरेज
हा फोन 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे आणि ह्याला 32GB च्या मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी सेलकॉनने बाजारात आपला नवीन फोन डायमंड 4G प्लस लाँच केला आहे. कंपनीने ह्या फोनची किंमत ६,३६९ रुपये ठेवली आहे. हा फोन विक्रीसाठी ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर हा अनेक थर्ड पार्टी ऑनलाइन रिटेल साइटवरसुद्धा मिळत आहे.
जर ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची IPS HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा फोन 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे आणि 32GB च्या मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 3.2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरा दिला गेला आहे. ह्या फोनमध्ये 2200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये GPRS/एज, 3G, वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ V4.0, FM रेडियो, मायक्रो-USB 2.0, USB OTG आणि GPS/A-GPS फीचर्ससुद्धा आहे.
हेेदेखील वाचा – ओला ने आणली ऑटो कनेक्ट वायफाय सुविधा
हेदेखील वाचा – करिअरविषयक मार्गदर्शन करणारे महत्त्वपुर्ण अॅप्स