देशात आजकाल कॉल ड्रॉपची समस्या अनेकदा पाहायला मिळतेय. म्हणूनच दूरसंचार नियामक ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्स विरोधात कठोर पावले उचलत अशी घोषणा केली आहे की, आतापासून कॉल ड्रॉप झाल्यावर ग्राहकांना भरपाई म्हणून १ रुपया दिला जाईल.
दूरसंचार नियामक ट्रायची ह्या शिफारशीची अंमलबजावणी १ जानेवारीपासून लागू केली जाईल. मात्र १ दिवसात केवळ ३ कॉल्ससाठीच ही भरपाई दिली जाईल. ट्रायच्या शिफारशीनुसार प्रत्येक दिवसासाठी केवळ तीन कॉल्ससाठीच भरपाई मिळेल. कॉल ड्रॉप झाल्यानंतर ४ तासांच्या आत टेलिकॉम ऑपरेटर्संना ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून भरपाईच्या रकमेची माहिती द्यावी लागेल. पोस्ट-पेड वापरकर्त्याला नुकसान भरपाई त्याच्या पुढील महिन्याच्या बिलात दिली जाईल.
दूरसंचार नियामक ट्रायने गुरुवारी सांगितले की, मुंबई आणि दिल्लीमध्ये ‘कॉल ड्रॉप’ च्या समस्येत काही उल्लेखनीय सुधार झाला नाही आणि टेलिकॉम ऑपरेटर मानकांना पूर्ण करण्याच्या बाबतीत अनेक बाबतीत मागे आहेत. ट्रायने सांगितले की, मुंबईत कोणतीही मोबाईल सेवा प्रदाता मानकांना पूर्ण करु शकत नाहीय, तर दिल्लीत तीन प्रमुख कंपन्या एयरटेल, वोडाफोन आणि एयरसेल गुणवत्तापुर्ण सेवा देण्यासाठी अनेक गोष्टीत मागे राहिल्या आहेत.
त्यामुळे कॉल ड्रॉप होण्याच्या समस्येला सरकारने गुरुवारी खराब सेवेसाठी कंपन्यांवरती लावलेला दंड विनियामकद्वारा घोषित केलेल्या नव्या नियमांनुसार दुप्पट केला आहे.
ह्याविषयी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आपल्या वेबसाइटवर नियम लागू केले आहेत, ज्यात असे सांगितले गेले आहे की, ज्या कंपन्या कोणत्याही एक तिमाहीमधील मानकचा पहिल्यांदा अनुपालन करणार नाही, त्याच्यावर १ लाख रुपये दंड ठोठावला जाईल, ज्यासाठी आधी ५० हजार रुपये दंड होता.
कंपन्यांच्या सेवांना जवळपास १५ मानकांवर निरीक्षण केले जाते, ज्यात तांत्रिक आणि ग्राहक सेवा दोन प्रमुख श्रेणीमध्ये विभागलेले असतात. त्याचबरोबर भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने असेही सांगितले की, एकाच मानकावरती ऑपरेटर्स सलग दोनदा किंवा तीनदा पुर्ण करु शकले नाही, तर त्यांच्या दंडाची रक्कम दीड लाख रुपये केली जाईल आणि त्यानंतर तिमाही दंडाची रक्कम दोन लाख रुपये घेतली जाऊ शकते.
त्याशिवाय भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने असेही सांगितले की, जर कंपनी दोन डिफॉल्टिंग तिमाहींच्यामध्ये एका तिमाहीवर खरी उतरली , तर दंडाची रक्कम परत १ लाख रुपये केली जाईल.