Xiaomi फ्लॅगशिप डेज सेल सुरू झाला आहे. 6 ते 11 जून पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला Xiaomi चे प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन्स 6 हजार रुपयांपर्यंतच्या इन्स्टंट डिस्काउंटसह खरेदी करता येतील. या सवलतीसाठी वापरकर्त्यांना ICICI बँक कार्डने पैसे द्यावे लागतील. Amazon India वर लाइव्ह झालेल्या या सेलमध्ये, इन्स्टंट डिस्काउंट व्यतिरिक्त, प्रीपेड ऑर्डरवर 2,000 रुपये अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे. एवढेच नाही तर तुम्हाला कंपनीच्या फ्लॅगशिप डेज सेलमध्ये 4,000 रुपयांपर्यंत एक्सट्रा कूपन डिस्काउंट देखील मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या सेलच्या काही टॉप डील्सबद्दल…
Xiaomi चा हा प्रीमियम फोन Amazon India वर 62,999 रुपयांपासून लिस्ट झाला आहे. कंपनी या फोनवर 6,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. याशिवाय तुम्ही हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 4 हजार रुपयांचे कूपन डिस्काउंटही मिळेल. या दोन्ही ऑफरसह, या फोनची किंमत 10 हजार रुपये कमी होईल. हा Xiaomi फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सल्सचे तीन रियर कॅमेरे आहेत.
हे सुद्धा वाचा : Nokia ने आणला हार्ट स्टीलिंग 5G स्मार्टफोन, मजबूत बॅटरीसह मिळेल आकर्षक डिझाइन
Xiaomi चा हा हायपरफोन सेलमध्ये अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे. Amazon India वर त्याची सुरुवातीची किंमत आता 32,499 रुपये झाली आहे. फोनवर 4,500 रुपयांपर्यंतचे इन्स्टंट डिस्काउंट दिली जात आहे. तुम्ही प्रीपेड ऑर्डर केल्यास तुम्हाला आणखी एक हजार रुपयांचा बेनिफिट मिळेल. त्याचप्रमाणे, तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत एक्स्ट्रा-डिस्काउंट देखील मिळू शकतो. मात्र, यासाठी तुमच्या जुन्या किंवा आताच्या फोनची स्थिती नीट असायला हवी. हा फोन 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह येतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 888 5G प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोन 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी यामध्ये 108 मेगापिक्सल्सचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
कंपनीच्या फ्लॅगशिप डेज सेलमध्ये हा फोन 2,500 रुपयांपर्यंत त्वरित डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. प्रीपेड ऑर्डर करणाऱ्या यूजर्सना हा फोन 2,000 रुपयांनी स्वस्त मिळेल. आणि, जर तुम्ही एक्सचेंज ऑफरसह फोन खरेदी केला तर तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळेल. या फोनमध्ये 6.55-इंच लांबीचा डॉल्बी व्हिजन डिस्प्ले आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये Snapdragon 778G चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 64-मेगापिक्सेल AI ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.