Xiaomi 15 Ultra वर मिळतोय थेट 10,000 रुपयांच्या Discount, जाणून घ्या Best ऑफर

Updated on 23-Apr-2025
HIGHLIGHTS

Xiaomi चा प्रिमियम फोन Xiaomi 15 Ultra अलीकडेच भारतीय बाजारात लाँच

या फोनवर सध्या तुम्हाला तब्बल 10,000 रुपयांची बचत करता येईल.

फोटोग्राफीसाठी Xiaomi 15 Ultra फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi चा प्रिमियम फोन Xiaomi 15 Ultra अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला आहे. लाँचच्या अवघ्या काही काळातच या फोन सध्या मोठ्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. या फोनवर सध्या तुम्हाला तब्बल 10,000 रुपयांची बचत करता येईल. फोनच्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 200MP टेलेफोटो सेन्सरसारखे पॉवफुल फीचर्स मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात Xiaomi 15 Ultra ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: लाँचपूर्वीच CMF Phone 2 Pro ची भारतीय किंमत Leak! आताच बजेट प्लॅन करा, काय मिळेल विशेष?

Xiaomi 15 Ultra ची किंमत आणि ऑफर्स

Xiaomi 15 Ultra च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon वर तुम्हाला 16GB रॅम आणि 512 स्टोरेज व्हेरिएंट 1,09,999 रुपयांना मिळेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बँक कार्डद्वारे थेट फोनवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, फोनवर तुम्हाला नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

xiaomi 15 ultraxiaomi 15 ultra
xiaomi 15 ultra

Xiaomi 15 Ultra चे फीचर्स आणि स्पेक्स

Xiaomi 15 Ultra फोनमध्ये 6.73-इंच लांबीचा WQHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 3200x 1440 पिक्सेल आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Elite प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये Xiaomi 3D ड्युअल-चॅनेल आइसलूप सिस्टम आहे, जे दीर्घ गेमिंग सत्रादरम्यान फोन गरम होण्यापासून रोखते. तसेच, सुरक्षेसाठी, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

फोटोग्राफीसाठी Xiaomi 15 Ultra फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP चा LYT-900 प्रायमरी कॅमेरा आहे. यासह, तुम्हाला 200MP टेलिफोटो सेन्सर, 50MP कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर मिळतो. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5410mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W हायपरचार्ज चार्जिंगला सपोर्ट करते.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :