तब्बल 10,000 रुपयांच्या Discount सह मिळतोय नवा-कोरा Xiaomi 15 Ultra, मिळेल 200MP कॅमेरा

Xiaomi ने अलीकडेच भारतात Xiaomi 15 Ultra फोन लाँच केला.
पहिल्या सेलमध्ये Xiaomi 15 Ultra फोनवर तब्बल 10,000 रुपयांची सवलत मिळत आहे.
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन लेटेस्ट Snapdragon 8 Elite प्रोसेसरद्वारे सुसज्ज करण्यात आला आहे.
Xiaomi ने अलीकडेच भारतात Xiaomi 15 Ultra फोन लाँच केला आहे. हा कंपनीचा नवीनतम प्रीमियम स्मार्टफोन आहे. दरम्यान, या फोनची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. या सिरीजअंतर्गत, Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra फोन सादर करण्यात आले आहेत. आजपासून भारतात या स्मार्टफोन्सची विक्री सुरू झाली आहे.
Also Read: Samsung ने लाँच केले सर्वोत्तम टॅबलेट्स! पहिल्यांदाच टॅबमध्ये मिळतील जबरदस्त AI फीचर्स, पहा किंमत
या प्रीमियम फोनमध्ये भारी डिझाईन आणि आकर्षक लुक मिळणार आहे. तुम्ही Amazon आणि Xiaomi च्या अधिकृत साईटद्वारे हा फोन खरेदी करू शकता. पहिल्या सेलमध्ये Xiaomi 15 Ultra फोनवर तब्बल 10,000 रुपयांची सवलत मिळत आहे. पहा किंमत आणि ऑफर्स-
Xiaomi 15 Ultra ची किंमत आणि ऑफर्स
Xiaomi 15 Ultra फोन फक्त एकाच 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या या व्हेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. सेल ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, जर तुम्ही ICICI बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास, तुम्हाला 10,000 रुपयांची सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Xiaomi 15 Ultra चे फीचर्स आणि स्पेक्स
Xiaomi 15 Ultra मध्ये 6.73-इंच लांबीचा WQHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरद्वारे सुसज्ज करण्यात आला आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 15 आधारित हायपरओएस 2.0 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5410mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा LYT-900 प्रायमरी कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त, त्यात 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 200MP ISOCELL HP9 पेरिस्कोप सेन्सर समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile