Xiaomi 14 Civi वर मिळतोय हजारो रुपयांचा Discount, बँक ऑफर्ससह स्वस्तात खरेदीची संधी
Xiaomi 14 Civi कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारात सादर केला.
आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन ड्युअल सेल्फी कॅमेरासह येतो.
Xiaomi 14 Civi वर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स उपलब्ध
प्रसिद्ध टेक दिग्गज Xiaomi ने अलीकडेच आपला प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 14 Civi भारतीय बाजारात सादर केला होता. Xiaomi चा हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Xiaomi 14 Civi फोनची किंमत 40 हजार रुपयांपासून सुरु होते. सध्या Flipkart वर या स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. तुम्हाला बँक ऑफर्स, EMI आणि एक्सचेंज ऑफरची सुविधा सुरु आहे. चला तर मग जाणून घेऊयात Xiaomi 14 Civi ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: Flipkart Sale मध्ये Vivo V30 Pro 5G वर मिळतोय 4000 रुपयांची सूट, पहा जबरदस्त Discount ऑफर
Xiaomi 14 Civi ची किंमत आणि ऑफर्स
Xiaomi 14 Civi च्या या फोनची किंमत 40,999 रुपयांपासून सुरू होते. तर, या फोनचा दुसरा व्हेरिएंट 46,999 रुपयांसह Flipkart वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart वरून हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची सूट मिळत आहे. त्याबरोबरच, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर ही ऑफर उपलब्ध असेल. तसेच, हा फोन नो कॉस्ट EMI वर खरेदी करता येईल.
एवढेच नाही तर, तुमच्या कडे जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंज करण्यासाठी असेल तर, 26,650 रुपयांची एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहे. तुम्हाला हा फोन एक्वा ब्लू, क्रूझ ब्लू आणि हॉट पिंक या तीन कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल. येथून खरेदी करा
Xiaomi 14 Civi चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 14 Civi स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच लांबीचा Quad Curved AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर, टच सॅम्पलिंग दर 240Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर मिळतो. हा फोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो.
फोटोग्राफीसाठी Xiaomi 14 Civi फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन ड्युअल सेल्फी कॅमेरासह येतो. स्मार्टफोनमध्ये 32MP मुख्य कॅमेरा आहे. फोन ऑटो फोकस सह येतो. तसेच, 32MP अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 4700mah ची बॅटरी आहे. फोनमध्ये USB Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile