Xiaomi 14 Offers: जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय हजारो रुपयांचा Discount, ऑफर्सचा होतोय भारी वर्षाव! 

Xiaomi 14 Offers: जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय हजारो रुपयांचा Discount, ऑफर्सचा होतोय भारी वर्षाव! 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने गेल्या मार्च महिन्यात आपला पॉवरफुल फ्लॅगशिप डिवाइस Xiaomi 14 फोन लाँच केला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा भारतीय बाजारपेठेतील सर्वात वेगवान प्रोसेसरसह येणारा 5G स्मार्टफोन आहे. सध्या हा स्मार्टफोन भारी सवलतींसह अतिशय कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. यासोबतच, नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Xiaomi 14 ची किमत आणि त्यावरील ऑफर्स-

Also Read: Motorola Edge 50 Neo Sale: 50MP कॅमेरासह लेटेस्ट फोनची पहिली सेल भारतात आज, मिळतील Best ऑफर्स

Xiaomi 14 xiaomi fan festival 2024

Xiaomi 14 वरील ऑफर्स

Xiaomi कंपनीने फ्लॅगशिप फोन Xiaomi 14 वर 10,000 रुपयांची सवलत दिली आहे. यासह, 7,000 रुपयांची कूपन सूट आणि 5,000 रुपयांपर्यंतची बँक सूट देखील मिळत आहे. यासह या फोनवर एकूण 22,000 रुपयांची सूट मिळते. या सर्व ऑफरसह तुम्हाला 69,999 रुपये किमतीचा हा फोन फक्त 47,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटसह या सर्व ऑफर्स तुम्हाला मिळतील.

एवढेच नाही तर, बँक आणि कूपन डिस्काउंट व्यतिरिक्त, ब्रँड नो-कॉस्ट EMI ची सुविधा देखील मिळणार त्याबरोबरच, एक्सचेंज ऑफरसह कंपनी तुम्हाला 35,000 रुपयांपर्यंतची सूट देऊ शकते. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon वर तुम्हाला वरील सर्व ऑफर्स मिळतील. लक्षात घ्या की, Xiaomi 14 डिवाइस कंपनीच्या वेबसाइटवर 59,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. Buy From Here

Xiaomi 14 चे फीचर्स आणि स्पेक्स

Xiaomi 14 मध्ये 6.36 इंच लांबीचा पंच-होल OLED LTPO डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यात गोरिल्ला ग्लास व्हिक्टस बसवण्यात आला आहे. डिव्हाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह समर्थित आहे. हा चिपसेट आतापर्यंतचा सर्वात वेगवान चिपसेट आहे. सुरक्षिततेसाठी, या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर, पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी यात IP68 रेटिंग आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये Leica कॅमेरा लेन्स, OIS सह 50MP प्राइमरी, 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP टेलीफोटो लेन्स आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 4,610mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसह उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ड्युअल सिम 5G, ब्लूटूथ, USB टाइप-C पोर्ट आणि Wi-Fi 7 सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

डिस्क्लेमर: या लेखामध्ये संलग्न म्हणजेच एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo