प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपला नवीन आणि स्वस्त 5G फोन भारतीय बाजारात सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने आपल्या Y-सीरीजचा विस्तार करत Vivo Y29 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा कंपनीचा एंट्री-लेव्हल 5G फोन आहे, जो Vivo Y28 5G चा सक्सेसर म्हणून लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा आणि Dynamic Light LED फ्लॅश देखील मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Vivo Y29 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: स्टायलिश लुकसह येणाऱ्या Vivo स्मार्टफोनवर मिळतोय भारी Discount, तब्बल 8000 रुपयांची सूट
Vivo Y29 स्मार्टफोन चार व्हेरिएंटमध्ये भारतात सादर केला गेला आहे. ज्यामध्ये 4GB+128GB, 6GB+128GB, 8GB+128GB आणि 8GB+256GB व्हेरिएंट यांचा समावेश आहे. या फोनची किंमत अनुक्रमे 13,999 रुपये, 15,999 रुपये, 16,999 रुपये आणि 19,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा फोन डायमंड ब्लॅक, ग्लेशियर ब्लू आणि टायटॅनियम गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Vivo Y29 5G मध्ये 6.68 इंच लांबीचा LCD पंच-होल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. चांगल्या कामगिरीसाठी, Vivo च्या नवीन स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज मिळणार आहे, जी SD कार्डच्या मदतीने वाढवता येते. या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. Vivo Y29 5G Android 14 आधारित FunTouch OS 14 वर कार्य करते.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या हँडसेटमध्ये डायनॅमिक लाइट LED फ्लॅश लाइट आणि 0.08MP सेकंडरी लेन्ससह 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फीसाठी हा फोन 8MP फ्रंट कॅमेराद्वारे सज्ज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या हँडसेटला IP64 रेटिंग मिळाली आहे, म्हणजेच हा मोबाईल डस्ट आणि वॉटर प्रूफ आहे.