महागडा स्मार्टफोन Vivo X100 मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी
Flipkart वरून Vivo X100 फोन 5000 रुपयांच्या सवलतीसह सूचिबद्ध
Vivo X100 सह तुम्हाला बँक ऑफर्स, EMI, एक्सचेंज ऑफर इ. मिळतील.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने Vivo X100 फोन अलीकडेच लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे कंपनीचे एक प्रीमियम उपकरण आहे. हे डिवाइस फ्लिपकार्ट सेल दरम्यान स्वस्तात खरेदी करता येणार आहे. होय, सेलदरम्यान उपलब्ध असलेल्या ऑफर्ससह हा महागडा फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला बँक ऑफर्स, EMI, एक्सचेंज ऑफर इ. मिळतील. जाणून घेऊयात Vivo X100 वरील ऑफर्स-
Vivo X100 फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची Flipkart वर 68,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. मात्र, तुम्ही आता हा स्मार्टफोन मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. Flipkart वरून तुम्ही 5000 रुपयांच्या सवलतीसह 63,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एवढेच नाही तर, बँक कार्डद्वारे या फोनवर 7000 रुपयांची सूट मिळेल. अशाप्रकारे, फोनच्या खरेदीवर तुम्हाला 12000 रुपयांचा पूर्ण फायदा मिळेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Vivo X100 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo X100 फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अप्रतिम परफॉर्मन्ससाठी Mediatek Dimensity 9300 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 14 वर कार्य करेल. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 16GB रॅमचा समावेश आहे. याशिवाय, स्टोरेज ऑप्शन्समध्ये 256GB आणि 512GB स्टोरेज समाविष्ट आहे.
Vivo X100 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP सेकंडरी कॅमेरा आणि 64MP तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.