Best Offer! 100W फास्ट चार्जिंगसह येणाऱ्या Vivo च्या महागड्या फोनवर तब्बल 10,000 रुपयांचा Discount, पहा ऑफर 

Best Offer! 100W फास्ट चार्जिंगसह येणाऱ्या Vivo च्या महागड्या फोनवर तब्बल 10,000 रुपयांचा Discount, पहा ऑफर 
HIGHLIGHTS

Vivo X100 Pro 5G स्मार्टफोनवर मिळतेय प्रचंड सूट

Vivo X100 Pro च्या खरेदीवर 10,000 रुपयांची सूट मिळणार आहे.

Vivo X100 Pro 5G मध्ये 50MP चे तीन लेन्स देण्यात आले आहेत.

Vivo X100 Pro 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच Vivo X100 Pro 5G भारतीय बाजारात सादर केला आहे. हा स्मार्टऑन खरेदी करण्यास इच्छा असल्यास ग्राहकांना बजेटबद्दल विचार करावा लागतो. कारण हा स्मार्टटफोन महागड्या बजेट श्रेणीमध्ये मोडतो. मात्र, तुमच्यासाठी अगदी आनंदाची बातमी आहे, कारण सध्या हा फोन Croma वर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, वाचा सविस्तर

Vivo X100 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo X100 Pro 5G ची किंमत 89,999 रुपये आहे. ही किंमत या फोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, IDFC आणि Kotak बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास Vivo X100 Pro च्या खरेदीवर 10,000 रुपयांची सूट मिळणार आहे. या फोनवर 4,237 रुपयांची EMI देखील दिली जात आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही क्रोमाच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता.

vivo x100 pro 5g स्मार्टफोनवर मिळतेय प्रचंड सूट

Vivo X100 Pro 5G

Vivo X100 Pro 5G मध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 9300 प्रोसेसर देण्यात आला आहे. MediaTek Dimensity 9300 गेमिंगमध्ये उत्कृष्ट आहे, हाय फ्रेम रेट, लो लेटेन्सी इ. ऑफर करते. यामध्ये पॉवरफुल GPU आणि ऍडव्हान्स AI फीचर्स इमर्सिव गेमिंग अनुभव मिळेल.

Vivo X100 Pro 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चे तीन लेन्स देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo X100 Pro मध्ये 5400mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ही बॅटरी वेब सर्फिंग आणि इतर मूलभूत कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकू शकते. या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, Bluetooth आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo