Best offer! Vivo च्या फोल्डेबल स्मार्टफोनवर तब्बल 12,000 रुपयांची सूट, 100W फास्ट चार्जिंग उपलब्ध
Vivo चा Vivo X Fold3 Pro 5G फोन सध्या Flipkart वर मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध
सध्या Flipkart वर Big Bachat Days Sale सुरु आहे.
बँक कार्डद्वारे Vivo X Fold3 Pro 5G फोन खरेदी केल्यास 12000 रुपयांपर्यंत सूट
सध्या जिकडे तिकडे फोल्डेबल स्मार्टफोन्सचे क्रेझ वाढत चालले आहे. हे स्मार्टफोन्स दिसायला स्टायलिश आणि अप्रतिम फीचर्ससह लाँच होत असल्यामुळे जास्त आकर्षक असतात. मात्र, फोल्डेबल स्मार्टफोन्स लव्हर्ससाठी आम्ही आनंदाची बातमी आणली आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा Vivo X Fold3 Pro 5G फोन सध्या Flipkart वर मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, सध्या Flipkart वर Big Bachat Days Sale सुरु आहे. जाणून घेऊयात Vivo X Fold3 Pro 5G वरील ऑफर्स-
Also Read: Oppo Find X8 Series ची भारतीय लाँच डेट जाहीर! आगामी स्मार्टफोन्सचे प्री-बुकिंग देखील सुरु, पहा ऑफर्स
Vivo X Fold3 Pro 5G वरील ऑफर्स
Vivo X Fold3 Pro 5G फोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 1,59,999 रुपये इतकी आहे. परंतु, तुम्ही फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल दरम्यान हा स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोणत्याही बँक कार्डद्वारे Vivo X Fold3 Pro 5G फोन खरेदी केल्यास तुम्हाला 12000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. येथून खरेदी करा
Vivo X Fold3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स
Vivo X Fold3 Pro 5G फोन ओपन केल्यास 8.03 इंच लांबीचा डिस्प्ले मिळतो. तर हा फोन फोल्ड केल्यानंतर 6.53 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर प्रगत AI क्षमतेसह असाधारण कार्यप्रदर्शन देतात, ज्यामुळे ते हाय-एंड स्मार्टफोनसाठी आदर्श बनतात. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये सिंगल 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट आहे.
फोटोग्राफीसाठी, Vivo X Fold3 Pro 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 64MP चा तिसरा सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5700mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile