लेटेस्ट Vivo V50 5G फोनवर होतोय ऑफर्सचा वर्षाव, मिळेल तब्बल 9000 रुपयांची सूट!

Updated on 17-Mar-2025
HIGHLIGHTS

Vivo ने अलीकडेच Vivo V50 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला.

तुम्ही हा फोन Flipkart वरून मोठ्या सवलतीसह खरेदी करण्यास सक्षम असाल.

Vivo V50 5G एक अल्ट्रा-स्लिम फोन आहे, जो 6000mAh बॅटरीसह येतो.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच Vivo V50 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन लाँच होताच भारतीय बाजारात लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे कंपनी या लाईनअपचा विस्तार देखील करत आहे. हा फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हा फोन Flipkart वरून मोठ्या सवलतीसह खरेदी करण्यास सक्षम असाल. हा फोन हजारो रुपयांच्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo V50 5G फोनची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: New Smartphones Launch This Week: परवडणाऱ्या किमतीत जबरदस्त स्मार्टफोन्स भारतात होणार लाँच, पहा यादी

Vivo V50 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo V50 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 42,999 रुपये इतकी आहे. मात्र, सध्या तुम्ही हा फोन Flipkart वरून मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या हा फोन 6000 रुपयांच्या डिस्काउंटसह 36,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँक कार्डद्वारे 3000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे. इतकेच नाही तर, जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला 3000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Vivo V50 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V50 5G फोनमध्ये 6.77-इंच लांबीचा क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर दिला गेला आहे. तसेच, हा फोन Android 15 आधारित FOS15 वर कार्य करतो. पाण्याच्या संरक्षणासाठी, या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आले आहेत.

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या Vivo V50 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या सेटअपमध्ये 50MP चा ZEISS प्रायमरी कॅमेरा आहे. तर, सेकंडरी कॅमेरा देखील 50MP चा आहे. एवढेच नाही तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळत आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये बॅटरी 6000mAh उपलब्ध आहे, ज्यामध्ये 90W फ्लॅश चार्ज सपोर्ट उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, हा एक अल्ट्रा-स्लिम फोन आहे, जो 6000mAh बॅटरीसह येतो.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :