प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Vivo ने अलीकडेच Vivo V40 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. आम्ही तुमहाला सांगतो की, Vivo V40 Pro 5G हा स्मार्टफोन ऍडव्हान्स फीचर्ससह येणारा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला देखील हा फ्लॅगशिप फोन खरेदी करायचा असेल तर, हीच योग्य वेळ आहे. कारण सध्या इ-कॉमर्स साईट Flipkart वर हा फोन मोठ्या सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo V40 Pro 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: Price Drop! नवा फोन लाँचपूर्वीच Redmi 13 5G च्या किमतीत घसरण, पहा नवीन किंमत
नवा फ्लॅगशिप फोन Vivo V40 Pro 5G फोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 60,999 रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन सध्या 5000 रुपयांच्या सवलतीसह 55,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची वेगळी सूट दिली जाणार आहे. अशाप्रकारे तुम्हाला हा फोन तब्बल 8000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Vivo V40 Pro 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Mediatek Dimensity 9200+ प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. यासोबतच, या फोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. विशेषतः ता फिचरद्वारे तुम्ही तुमच्या फोटोमधून अनोळखी आणि नको त्या वस्तू हटवण्यास सक्षम असाल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40 Pro 5G फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅम आणि 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शन्स दिले गेले आहेत. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा ZEISS OIS सपोर्टसह उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 50MP सेकंडरी आणि 50MP तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या सेन्सरमध्ये हाय रिझोल्युशन, लाइव्ह फोटो, नाईट, पोर्ट्रेट, फोटो, व्हिडिओ, मायक्रो मूव्ही, ड्युअल व्ह्यू सपोर्ट आहे. तर, फोनच्या मागील बाजूस स्मार्ट ऑरा लाईट देखील दिली गेली आहे. वॉटर प्रोटेक्शनसाठी या फोनला IP68 रेटिंग आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.