प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने आपल्या Vivo V40 सिरीजच्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स जाहीर केले आहेत. त्यामुळे या सिरीजचे स्मार्टफोन्स खरेदी करण्याची हीच योग्य संधी आहे. त्यापैकी सध्या Vivo V40 5G स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा प्रीमियम स्मार्टफोन पुन्हा एकदा स्वस्त करून देण्यात आला आहे. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वरून हा फोन तुम्ही खरेदी करू शकता. चला तर मम्ग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo V40 5G ची किंमत आणि डिस्काउंट-
Also Read: Upcoming Smartphones Launch: ‘या’ आठवड्यात भारतात दाखल होणार नवे फोन्स, OnePlus Oppo यादीत समाविष्ट
लोकप्रिय Vivo V40 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन सध्या 5000 रुपयांच्या सवलतीसह 34,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 2000 रुपयांची वेगळी सूट मिळणार आहे. तसेच, या एक्सचेंज ऑफरद्वारे या फोनवर 22,850 रुपयांपर्यंत सूट देखील मिळेल. येथून खरेदी करा
Vivo V40 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Vivo V40 5G फोन Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Snapdragon 7 Gen 3 कार्यक्षमता आणि उष्णता व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून उत्कृष्ट कार्यप्रदर्शन देते. तसेच, हा फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. याशिवाय, या फोनमध्ये अनेक AI फीचर्सचे ऍक्सेस देखील आहे. वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये IP68 रेटिंग देण्यात आली आहे.
Vivo V40 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये OIS सपोर्ट आहे. तर, 50MP सेकंडरी कॅमेरा मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40 5G फोनमध्ये 8GB आणि 12GB रॅम पर्याय आहेत. तर, 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज असे तीन व्हेरिएंट मिळतील.