प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच भारतीय बाजारात Vivo V40 सिरीज लाँच केली होती. या स्मार्टफोन सिरीजअंतर्गत कंपनीने Vivo V40e, Vivo V40 5G आणि Vivo V40 Pro मॉडेल्स सादर केले होते. हे स्मार्टफोन लाँच होताच मोठ्या प्रमाणत लोकप्रिय झाले. हे फोन्स कंपनीने मिड बजेटमध्ये लाँच केले आहेत. तुम्हाला सुद्धा Vivo V40 5G स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर, हा स्मार्टफोन तुम्ही मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, EMI इ. मिळतील. जाणून घेऊयात Vivo V40 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
लेटेस्ट Vivo V40 5G या स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, या फोनचा टॉप व्हेरिएंट 41,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या Amazon वरून हा Vivo फोन खरेदी करण्यावर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. ही ऑफर SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल. ते EMI वर देखील खरेदी करता येते. हे फोन्स Ganges Blue, Lotus Purple आणि Tatanium Grey कलर ऑप्शन्समध्ये समावेश आहे. Buy From Here
या Vivo फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह सज्ज आहे. हा फोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट आहेत. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 12GB रॅमसह 512GB स्टोरेज आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
याव्यतिरिक्त, यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 50MP सेकंडरी सेन्सर आहे. त्याच्या मागील बाजूस फ्लॅश देखील उपलब्ध आहे. तर, फोनच्या मागील बाजूस स्मार्ट ऑरा लाइट देखील आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी IP68 रेटिंग मिळते. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जो 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट देखील आहे.