स्टायलिश लुकसह येणाऱ्या Vivo स्मार्टफोनवर मिळतोय भारी Discount, तब्बल 8000 रुपयांची सूट

Updated on 24-Dec-2024
HIGHLIGHTS

Vivo V30 Pro फोनवर मोठ्या डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी Vivo V30 Pro 5G फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो.

आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 50MP फ्रंट कॅमेरा

Vivo या वर्षी लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपन्यांच्या यादीत शीर्षस्थानी सामील झाली आहे. सध्या कंपनी आपल्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर्स जाहीर करत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Vivo V30 Pro फोनवरील डिस्काउंट ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला होता. Flipkart वर या 5G स्मार्टफोनवर सोनेरी डील उपलब्ध आहे. तसेच, हा फोन आकर्षक फोटोग्राफीसाठी उत्तम आहे. चला तर जाणून घेऊयात Vivo V30 Pro ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Limited Time Deal! OnePlus Nord CE4 5G वर मिळतायेत आकर्षक ऑफर्स! महागडे Buds अगदी Free

Vivo V30 Pro ची किंमत आणि ऑफर्स

Vivo V30 Pro 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 46,999 रुपये इतकी आहे. मात्र, आत्ता तुम्ही हा फोन थेट 38,999 रुपयांना म्हणजेच तब्बल 8000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करण्यास सक्षम असाल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडकी बँक कार्डद्वारे फोन पेमेंट व्यवहार केल्यास 4000 रुपयांची सूट मिळेल. अशा परिस्थितीत, तुम्ही हा फोन केवळ 34,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Vivo V30 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V30 Pro 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन 4 nm Mediatek Dimensity 8200 5G प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. तसेच, फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB RAM आणि 12GB RAM पर्याय आहेत. तसेच, 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शन्सदेखील समाविष्ट आहेत. हा फोन अंदमान ब्लू आणि क्लासिक ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शन्ससह येतो.

Vivo V30 Series

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Vivo V30 Pro 5G फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP दुसरा सेन्सर आणि 50MP तिसरा सेन्सर समाविष्ट आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये Aura Light सपोर्ट देखील आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 5000mAh आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :