अलीकडेच लाँच झालेल्या Vivo V29e 5G फोनवर मिळतोय तब्बल 5000 रुपयांचा Discount, बघा Best ऑफर

Updated on 04-Dec-2023
HIGHLIGHTS

सध्या सिरीजमधील Vivo V29e 5G वर ऑफर्स उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्ट या Vivo V29e 5G वर 5000 रुपयांची सूट देत आहे.

बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास 1500 रुपयांची सूट

Vivo ने अलीकडेच Vivo V29 सिरीज लाँच केली होती. लाँच होताच या सीरिजला ग्राहकांनी भरपूर पसंती दिली. या सीरिजमधील स्मार्टफोनच्या स्टायलिश लुकसह त्यातील फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स देखील जबरदस्त आहेत. सध्या सिरीजमधील Vivo V29e 5G वर ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा फोन तुम्ही लाँच किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. बघुयात ऑफर्स-

Vivo V29e 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo V29e 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 31,999 रुपये आहे. Vivo V29e 5G वर उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart फोनवर 5000 रुपयांची सूट देत आहे. डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन 26,999 रुपयांना खरेदी करू शकता.

बँक ऑफर्समध्ये बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास 1500 रुपयांची सूट मिळणार आहे. Flipkart Axis बँक कार्डद्वारे तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. तसेच, EMI आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यासह तुम्ही स्मार्टफोन सहज खरेदी करण्यास सक्षम असाल. येथून खरेदी करा

Vivo V29e 5G

Vivo V29e 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच फुल HD+ कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच, फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि हे Android 13 वर काम करते. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

Vivo V29e 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 64MP प्रायमरी आणि 8MP सेकंडरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :