Vivo V27 Series On Discount: 50MP सेल्फी कॅमेरासह सिरीज स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जोरदार सूट

Updated on 24-Jul-2023
HIGHLIGHTS

Vivo ची लोकप्रिय सिरीज बंपर ऑफरसह सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध

Vivo V27 फोन खरेदी करताना HDFC आणि SBI बँक कार्ड्सद्वारे व्यवहार केल्यास 2,500 रुपयांचा डिस्काउंट

सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.

Vivo ची लोकप्रिय सिरीज बंपर ऑफरसह सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायच असेल तर Vivo V27 सिरीज तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. Vivo V27 सिरीज साईटवर प्रचंड सवलत आणि ऑफरसह उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही लाइनअपचा मोबाइल स्वस्तात खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स- 

Vivo V27 Series ची किमंत आणि ऑफर्स

 Vivo V27 यावेळी फ्लिपकार्टवर 32,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. तर, प्रो मॉडेल तुमच्यासाठी 42,999 रुपयांना उपलब्ध आहे. दोन्ही स्मार्टफोनची मूळ किमंत अनुक्रमे 36,999 आणि 45,990 रुपये इतकी आहे. 

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तर  Vivo V27 फोन खरेदी करताना HDFC आणि SBI बँक कार्ड्सद्वारे व्यवहार केल्यास 2,500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्याबरोबरच, Vivo V27 Pro खरेदी करताना तुम्ही दिग्गज बँक कार्डद्वारे व्यवहार केल्यास 3,000 रुपयांची सूट मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, दोन्ही मोबाईल फोनवर एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट EMI सुविधा उपलब्ध आहे. 

डिस्प्ले:

कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. कर्व स्क्रीनद्वारे तुमच्या हातात फोनची पकड चांगली असते. AMOLED आणि OLED मध्ये चांगली गुणवत्ता, चांगले रंग पुनरुत्पादन, सूर्यप्रकाशात चांगली दृश्यमानता, चांगले कॉन्ट्रास्ट आणि चांगला बॅटरी बॅकअप इ. फीचर्स मिळतात. 

प्रोसेसर:

 Vivo V27 मध्ये Meditek Dimensity 7200 प्रोसेसर देण्यात आला आहे. Dimensity 7200 मध्ये अत्याधुनिक AI इमेजिंग फिचर, पावरफुल गेमिंग ऑप्टिमायझेशन आणि इम्प्रेसिव्ह 5G स्पीड मिळेल. 

Vivo V27 Pro मध्ये Meditek Dimensity 8200 चिपसेट मिळेल. MediaTek Dimensity 8200 मध्ये उच्च ऊर्जा कार्यक्षमतेच्या CPU साठी स्टॅंडर्ड सेट करते, ज्यामुळे वापरकर्त्यांना दीर्घकाळ बॅटरी लाईफ आणि गेममध्ये फास्ट फ्रेम रेट मिळतील.

कॅमेरा:

दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये पहिला 50MP, दुसरा 8MP आणि तिसरा 2MP चा लेन्स आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. स्मार्टफोनसाठी 50 MP कॅमेरा उत्कृष्ट मानला जातो. हायर मेगापिक्सेल काउंटसह तुम्हाला शार्प आणि मोअर डिटेल्ड इमेज, विशेषत: फोटो झूम करताना किंवा क्रॉप करताना अधिक स्पष्टता मिळते. 

बॅटरी:

दोन्ही फोनमध्ये फास्ट चार्जिंगसाठी तुम्हाला 4600mAh बॅटरी मिळणार आहे. यामध्ये USB टाईप C पोर्ट देखील मिळणार आहे. 4600mAh बॅटरी किमान 4.5 तास चालेल. बॅटरीचे amp hour रेटिंग जितके जास्त असेल तितका बॅटरीचा रन-टाइम जास्त असेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :