Vivo T3 Ultra 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने Vivo T3 Ultra फोन मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध करून दिला आहे. जर तुम्हाला देखील हा फोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वरून हा फोन खरेदी करण्यास सक्षम असाल. हा फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन 50MP प्रायमरी आणि फ्रंट कॅमेरासह येतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo T3 Ultra ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: दीर्घकाळ बॅटरी लाईफसह फक्त 1,299 रुपयांमध्ये भारी Smartwatch लाँच, जाणून घ्या सविस्तर
Vivo T3 Ultra फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 39,999 रुपये आहे. मात्र, सध्या तुम्ही हा फोन कमी किमतीत खरेदी करू शकता. डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही हा फोन Flipkart वरून 33,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच, बँक कार्डद्वारे या फोनवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. येथून खरेदी करा
Vivo T3 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर आहे. तसेच, हा फोन अँड्रॉइड 14 आधारित फनटच OS 14 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB रॅम+ 128GB स्टोरेज, 8GB रॅम+ 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम+ 256GB स्टोरेज अशा तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.
याव्यतीरिक्त, फोटोग्राफीसाठी Vivo T3 Ultra फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5500mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 80W चा फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.