Vivo T3 Pro Price Cut
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने काही काळापूर्वी भारतात Vivo T3 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला होता. सध्या विवोचे मिड बेजत स्मार्टफोन मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फोन्स आकर्षक कॅमेरा आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह येतात. सध्या Flipkart वर Vivo T3 Pro 5G उत्तम डिस्काउंट, बँक ऑफर्ससह सादर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात Vivo T3 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या iQOO 13 5G वर अप्रतिम Discount! खरेदीपूर्वी पहा टॉप 5 फीचर्स
Vivo T3 Pro 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 31,999 रुपये इतकी आहे. तर, सध्या हा फोन केवळ 24,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन सध्या Flipkart वरून 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Vivo T3 Pro 5G फोनमध्ये 6.77-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2392x 1080 पिक्सेल आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट उपलब्ध आहे. यासोबतच, फोनमध्ये 128GB आणि 256GB असे दोन स्टोरेज पर्याय आहेत.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP सोनी IMX882 प्रायमरी कॅमेरा आणि 8MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 80W फ्लॅशचार्ज सपोर्ट आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.