Tecno Spark 9 वर मिळतेय स्पेशल डील, स्वस्त फोन आणखी कमी दरात खरेदी करा

Updated on 19-May-2023
HIGHLIGHTS

4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची खरी किंमत 11,499 रुपये

फोन 32% डिस्काउंटसह Amazon वर उपलब्ध

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1,500 रुपयांपर्यंत सूट

Amazon वर दररोज भारीतले डील्स उपब्ध करून दिले जातात. आज Tecno Spark 9 स्वस्तात खरेदी करता येईल. हा फोन 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासोबतच बँक ऑफर्स आणि ईएमआय ऑफर्सही दिल्या जात आहेत. तसेच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. बघुयात सविस्तर ऑफर्स – 

Tecno Spark 9 ऑफर्स :

यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. हा फोन 32% डिस्काउंटसह Amazon वर उपलब्ध आहे. या सवलतीसह हा फोन 7,799 रुपयांना साईटवर सूचिबद्ध आहे. तुम्ही हा फोन EMI वर दरमहा 373 रुपये देऊन सहज खरेदी करू शकता. यात तुम्हाला नो कॉस्ट- EMI चा पर्याय देखील मिळेल. 

बँक ऑफर्स देखील तुम्हाला यासह मिळणार आहेत. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1,500 रुपयांपर्यंत सूट दिली जाऊ शकते. म्हणजेच या फोनची किंमत आणखी कमी होईल. 

Tecno Spark 9 चे तपशील

फोनमध्ये 90 Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.6-इंच लांबीचा HD + डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. 4GB रॅम, व्हर्च्युअल 3GB रॅम आणि फोनमध्ये 64GB स्टोरेज आहे. तसेच, हा फोन MediaTek Helio G37 गेमिंग प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन HiOS 8.6 वर आधारित Android 12 वर काम करतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि फोटोग्राफीसाठी यामध्ये 13-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :