Tecno Pova 6 Pro 5G स्मार्टफोन्सवर सध्या भारी ऑफर्ससह उपलब्ध
ई-कॉमर्स कंपनी या फोनच्या खरेदीवर Tecno Buds 3 पूर्णपणे मोफत देणार आहे.
Tecno Pova 6 Pro 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटवर ऑफर उपलब्ध
Tecno Pova 6 Pro 5G Discount: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ने भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन्स अप्रतिम फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीत लाँच केले आहेत. त्यापैकी कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन Tecno Pova 6 Pro 5G सध्या भारी ऑफर्ससह उपलब्ध आहे. होय, लोकप्रिय इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर Tecno Pova 6 Pro 5G फोन प्रचंड सवलतीसह आणि आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे. जाणून घेऊयात Tecno Pova 6 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Tecno Pova 6 Pro 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. मात्र, Amazon वर हा फोन 19,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला बँक कार्डद्वारे फोनवर 1,999 रुपयांची सूट मिळेल. एवढेच नाही तर, ई-कॉमर्स कंपनी या फोनच्या खरेदीवर Tecno Buds 3 पूर्णपणे मोफत देणार आहे. येथून खरेदी करा
Tecno Pova 6 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Tecno Pova 6 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, MediaTek Dimensity 6080 सर्वात लोकप्रिय ॲप्सचा वेग वाढवते, दैनंदिन स्मार्टफोन अनुभव सुधारते. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे, ज्यासोबत कंपनीने 70W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. 19 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये फोन 50% चार्ज होईल, दावा कंपनीने केला आहे.
स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Tecno Pova 6 Pro 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचे 8GB+256GB आणि 12GB+256GB व्हेरिएंट उपलब्ध आहेत. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 108MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 3X इन-सेन्सर झूम आहे. तसेच, फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.