Best Offer! अगदी निम्म्या किमतीत Tecno 5G फोल्डेबल फोन खरेदी करण्याची संधी, मिळतोय तब्बल 24 हजार रुपयांचा Discount 

Best Offer! अगदी निम्म्या किमतीत Tecno 5G फोल्डेबल फोन खरेदी करण्याची संधी, मिळतोय तब्बल 24 हजार रुपयांचा Discount 
HIGHLIGHTS

Tecno Phantom V Flip 5G फोनवर मिळतेय प्रचंड सवलत

ब्रँड Tecno Phantom V2 Fold आणि V2 Flip 5G लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Tecno Phantom V Flip 5G फोनमध्ये डायमेंसिटी 8050 प्रोसेसर उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ने Phantom V Fold आणि Tecno Phantom V Flip 5G हे पहिले फोल्डेबल फोन म्हणून मागील वर्षी लाँच केले होते. त्यानंतर, आता अशा अफवा आहेत की, ब्रँड Phantom V2 Fold आणि Tecno Phantom V2 Flip 5G लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, अपेक्षित लाँच होण्याआधी मागील जनरेशनचे फोल्डेबल फोन Amazon India वर मोठ्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Also Read: Amazon Realme Narzo Week: लेटेस्ट 5G स्मार्टफोन्सवर मिळतेय अप्रतिम सूट, स्वस्तात खरेदी करण्याची जबरदस्त संधी

विशेषत: जर आपण V Flip 5G फोनबद्दल बोललो तर, हा फोन सध्या 17,000 रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटसह सूचीबद्ध आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला कूपन डिस्काउंट देखील मिळणार आहे. महागडे असल्यामुळे जे लोक फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्यास मागे पुढे बघतात, त्यांच्यासाठी पुढील ऑफर बेस्ट आहे.

Tecno Phantom V Flip 5G
Tecno Phantom V Flip 5G

Tecno Phantom V Flip 5G ची किमत आणि ऑफर्स

Amazon वर या Tecno Phantom V Flip 5G फोल्डेबल फोनची मूळ किंमत 71,999 रुपये इतकी आहे. मात्र, सध्या हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 54,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. चांगली गोष्ट म्हणजे हा फोन तुम्ही फक्त 30,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon या डिव्हाइसवर थेट 24,000 रुपयांचे कूपन ऑफर करत आहे. हे कुपन अप्लाय केल्यानंतर तुम्ही Tecno Phantom V Flip 5G किंमत फक्त 30,999 रुपये होईल. एवढेच नाही तर, निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास फोनवर 1,750 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. तसेच, फोनवर एक्सचेंज ऑफरसह 47,100 रुपयांपर्यंत बचत देखील करता येईल. येथून खरेदी करा!

Tecno Phantom V Flip 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

TECNO-Phantom-V-Flip-5G-features

Tecno चा हा फोल्डेबल 6.9-इंच लांबीच्या AMOLED मुख्य डिस्प्लेसह येतो, जे 120Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह येईल. तर, बाहेरील बाजूस 1.32-इंच लांबीचा सेकंडरी कव्हर डिस्प्ले आहे, जो त्वरीत नोटिफिकेशन्स आणि महत्त्वपूर्ण फीचर्स दर्शवतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये डायमेंसिटी 8050 प्रोसेसर उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी, हा फोन 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड लेन्स ऑफर करतो. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo