Tecno POVA 3 स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर आणि डिस्काउंट उपलब्ध
Tecno POVA 3 स्मार्टफोन केवळ 3,049 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो
Amazon वर फॅब फोन फेस्ट सेल सुरू आहे. हा सेल 28 जूनपासून सुरू झाला आणि आज म्हणजेच 30 जून हा सेलचा शेवटचा दिवस आहे. सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात येत आहे. सर्वात महागडे स्मार्टफोन अगदी स्वस्तात मिळत आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोनच्या शोधात असाल, पण बजेट कमी असेल तर ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. जर तुम्हाला मजबूत बॅटरी असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, ज्याची बॅटरी 3 दिवस चालेल. तर आम्ही तुम्हाला असा एक फोन सांगणार आहोत, जो फक्त 3 हजार रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो.
Tecno POVA 3 (128GB स्टोरेज)ची लॉंचिंग किंमत 14,999 रुपये आहे. परंतु, हा फोन Amazon वर 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनवर 13 टक्के सूट दिली जात आहे. याशिवाय, फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनची किंमत बरीच कमी होईल.
Tecno POVA 3 बँक ऑफर
तुम्ही Tecno POVA 3 खरेदी करण्यासाठी SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला एक हजार रुपयांची झटपट सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 11,999 रुपये असेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील आहे.
Tecno POVA 3 एक्सचेंज ऑफर
Tecno POVA 3 वर एकूण 8,950 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला बरीच सवलत मिळू शकते. परंतु तुम्हाला 8,950 रुपयांचा फुल ऑफ तेव्हाच मिळेल, जेव्हा तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल आणि लेटेस्ट मॉडेलचा असेल. तुम्ही फुल ऑफ मिळवण्यात यशस्वी झाल्यास, फोनची किंमत 3,049 रुपये असेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.