त्वरा करा ! SAMSUNG च्या फोनवर पहिल्यांदाच मिळतेय इतकी जबरदस्त ऑफर, वाचा सविस्तर

Updated on 28-Jul-2022
HIGHLIGHTS

फ्लिपकार्टवर 'मंथ एंड मोबाईल फेस्ट' लाईव्ह

Samsung Galaxy F13 स्मार्टफोनवर मिळतेय जबरदस्त ऑफर

तब्बल 11,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध

Samsung च्या बजेट स्मार्टफोन Galaxy F13 (4GB + 64GB) वर जबरदस्त ऑफर मिळत आहे. 'फ्लिपकार्टच्या मंथ एन्ड मोबाईल फेस्ट'मध्ये तुम्ही हा फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. 11,999 रुपयांच्या किंमतीसह या फोनवर तुम्हाला 1,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. ही सूट ICICI बँक कार्डसाठी आहे. जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 750 रुपयांपर्यंत सूट मिळेल. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतला तर तुम्हाला तब्बल 11,250 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. येथून खरेदी करा…

हे सुद्धा वाचा : भारतीयांसाठी खुशखबर ! आज Google Pixel 6a आणि Buds Pro पहिल्यांदाच जबरदस्त सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध 

Samsung Galaxy F13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगचा हा बजेट स्मार्टफोन अनेक महत्त्वाच्या आणि उत्तम फीचर्सने सज्ज आहे. यामध्ये कंपनी 6.6-इंच लांबीचा फुल HD + LCD पॅनल देत आहे. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येतो. कंपनीचा हा फोन 4 GB रॅम आणि 128 GB पर्यंत इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी Exynos 850 चिपसेट देत आहे, ज्यात Mali G52 आहे.

फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे दिलेले आहेत. यामध्ये 5-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरचा समावेश आहे. त्याच प्रमाणे, आकर्षक सेल्फीसाठी तुम्हाला या फोनच्या पुढील बाजूस 8-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर आधारित OneUI 4.0 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 4G, ड्युअल बँड Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, GPS आणि USB टाइप-C पोर्ट सारखे पर्याय मिळतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :