प्रसिद्ध Samsung Galaxy Z Flip5 5G फोन प्रचंड Discount सह खरेदी करा, सवलतीसह मोठी बचत करण्याची संधी। Tech News 

प्रसिद्ध Samsung Galaxy Z Flip5 5G फोन प्रचंड Discount सह खरेदी करा, सवलतीसह मोठी बचत करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोनवर प्रचंड सवलत

सेल दरम्यान या फोनवर 17,500 रुपयांचा वेगळा डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.

फोनवर बँक कार्डद्वारे 14,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.

फोल्डेबल स्मार्टफोन्सची गोष्ट निघाल्यास सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर Samsung कंपनीचे फोल्डेबल स्मार्टफोन येतात. मात्र, हे स्मार्टफोन्स अतिशय महागडे आणि सामान्य माणसाच्या खिशाला सहज परवडणारे नाहीत. त्यामुळे हे स्मार्टफोन घेण्यासाठी मन मोडावे लागते. पण आता तुम्हाला तुमची इच्छा मोडण्याची गरज नाही. कारण प्रसिद्ध Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोन प्रचंड सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे.

होय, Amazon सेल दरम्यान लाखो किमतीच्या Samsung फ्लिप फोनवर सध्या अप्रतिम ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफरनंतर Samsung Galaxy Z Flip5 5G फोनच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे.

samsung galaxy z flip5 5g

हे सुद्धा वाचा: अरे बापरे! OnePlus फोन्सची मोबाईल शॉप आणि रिटेल स्टोअर्सवर विक्री होणार बंद? 1 मे पासून होईल परिणाम। Tech News

Samsung Galaxy Z Flip5 5G फोनवरील किंमत

Samsung Galaxy Z Flip5 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत Amazon वर 1,02,999 रुपये आहे. पण, सध्या हा फोन Amazon वर 94,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. एवढेच नाही तर, सेल दरम्यान या फोनवर 17,500 रुपयांचा वेगळा डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Z Flip5 5G फोनवरील ऑफर्स

Samsung Galaxy Z Flip5 5G च्या फोनवर बँक कार्डद्वारे 14,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. तसेच, या फोनवर 3,500 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील उपलब्ध आहे. ‘अशा’प्रकारे फोन खरेदी करताना तुमची मोठी बचत होणार आहे. वरील सर्व सवलतींसह तुम्ही हा फ्लिप फोनवर तुम्ही मोठी बचत करू शकता. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Z Flip 5 Retro Accessories

Samsung Galaxy Z Flip5 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Flip5 5G फोनमध्ये दोन डिस्प्ले उपलब्ध आहेत. यात 6.7 इंच लांबीचा प्राथमिक डिस्प्ले आहे. त्याच्या मागील बाजूस 3.4 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले उपलब्ध आहे. Samsung Galaxy Z Flip5 5G फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेटअपमध्ये 12MP प्राथमिक आणि 12MP सेकंडरी कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 10MP कॅमेरा मिळणार आहे. त्याबरोबरच, यामध्ये 3700mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo