Samsung Galaxy S24 Ultra फ्लॅगशिप फोनवर मिळतोय तब्बल 25,000 रुपयांचा Discount, पहा Best ऑफर्स
Samsung चा Samsung Galaxy Unpacked इव्हेंट पुढील आठवड्यात आयोजित
Samsung Galaxy S24 Ultra सध्या Amazon रिपब्लिक डे सेलमध्ये मोठ्या सवलतीसह उपलब्ध
Amazon Great Republic Day सेलदरम्यान ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत फ्लॅगशिप मॉडेल खरेदी करण्याची संधी
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चा Samsung Galaxy Unpacked इव्हेंट पुढील आठवड्यात आयोजित केला गेला आहे. या इव्हेंटदरम्यान आगामी Samsung Galaxy S25 सिरीज मॉडेल्स देखील लाँच होतील, अशी अपेक्षा आहे. पण, त्याआधी Samsung Galaxy S24 Ultra सध्या Amazon रिपब्लिक डे सेलमध्ये मोठ्या सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. सेलदरम्यान ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत फ्लॅगशिप मॉडेल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Samsung Galaxy S24 Ultra फोनची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: Flipkart सेलमध्ये टॉप 5G Smartphones वर भारी Discount उपलब्ध, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी
Samsung Galaxy S24 Ultra ची किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy S24 Ultra फोनचे 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट सेलदरम्यान 1,03,900 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आले आहे. तर, फोनचे 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंट 1,10,490 रुपयांना सेलदरम्यान खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ही किंमत घसरण नक्कीच ‘Amazon ग्रेट रिपब्लिक डे’ मुळे आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, खरेदीदार बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
ऑफर्समध्ये खरेदीदारांना SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर तब्बल 5000 रुपयांच्या किमान खरेदीवर 1000 रुपयांपर्यंत म्हणजेच 10% झटपट सूट मिळेल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनवर 22,800 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवता येईल. चांगल्या एक्सचेंज व्हॅल्यूसाठी तुमचे जुने फोन उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या की, सेलदरम्यान किमती बदलत राहण्याची अपेक्षा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Samsung Galaxy S24 Ultra चे फीचर्स आणि स्पेक्स
Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच लांबीची QHD स्क्रीन देण्यात आली आहे. ही डायनॅमिक एमोलेड 2X स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्ले व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, जो स्क्रीन आउटपुटनुसार व्हिज्युअल प्रदान करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेराला सपोर्ट करतो. ज्यामध्ये तुम्हाला 200MP वाईड कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाईड लेन्स, 50MP टेलेफोटो लेन्स आणि 10MP टेलीफोटो सेन्सर आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह कार्य करते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile