नुकतेच लाँच झालेल्या Samsung Galaxy S24 5G स्वस्तात खरेदी करा, मिळतोय 5 हजार रुपयांचा Discount

Updated on 06-Feb-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S24 5G स्मार्टफोन नुकतेच लाँच करण्यात आला आहे.

HDFC बँकेकडून Galaxy S24 5G च्या खरेदीवर 5000 रुपयांची सूट

हा फोन नव्या Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येतो.

Samsung Galaxy S24 5G जानेवारी 2024 मध्ये लाँच करण्यात आला होता. Samsung Galaxy S24 5G हा कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन आहे. या मोबाईलवर मोठी सूट दिली जात आहे. होय, जर तुम्ही लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हीच योग्य वेळ आहे. कमी किमतीत हा मोबाईल फोन घरी आणण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे आहे. जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि उपलब्ध डील्सबद्दल सर्व माहिती-

Samsung Galaxy S24 series

Samsung Galaxy S24 5G ची किंमत आणि ऑफर्स

सॅमसंगने या Samsung Galaxy S24 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये ठेवली आहे. या फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon वरून हा फोन खरेदी केल्यास HDFC बँकेकडून Galaxy S24 5G च्या खरेदीवर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. फोन सहज खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट EMI देखील ऑफर केले जात आहे. तसेच, तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत 54,900 रुपयांची सूट मिळवू शकता. Buy From Here

Samsung Galaxy S24 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S24 5G फोनमध्ये 6.2 इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले मिळतो. याचे रिझोल्यूशन 2340 x 1080 पिक्सेल आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन नव्या Snapdragon 8 Gen 3 किंवा Exynos 2400 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा प्रोसेसर एक पॉवरफुल परफॉर्मर आहे, जो CPU कार्यक्षमतेच्या बाबतीत शेवटच्या पिढीच्या क्षमतांना लक्षणीयरीत्या मागे टाकतो. हा प्रोसेसर गेमिंगसाठी एक पॉवरहाऊस देखील आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे.

Gaming on the Samsung Galaxy S24 Ultra

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 10MP टेलिफोटो सेन्सर आणि 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 4000mAh आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइल फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, USB टाइप-C पोर्ट आणि ऑडिओ जॅक आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :