Best Offers! लेटेस्ट Samsung Galaxy S24 5G वर मिळतोय तब्बल 12000 रुपयांची सूट, पहा अप्रतिम डील

Updated on 19-Dec-2024
HIGHLIGHTS

Samsung ने जानेवारी 2024 मध्ये Samsung Galaxy S24 5G सिरीज भारतात लाँच केली होती.

सध्या Samsung Galaxy S24 5G स्मार्टफोनवर तब्बल 12000 रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध

फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटवर ही सवलत तुम्हाला 'या' ठिकाणी मिळत आहे.

Samsung ने या वर्षी म्हणेजच 2024 च्या सुरुवातीला आपली नवी नंबर सिरीज Samsung Galaxy S24 5G भारतात लाँच केली होती. नवीनतम सिरीजसह कंपनीने अधिकतर AI फीचर्स देखील सादर केले. ही कंपनीची प्रीमियम स्मार्टफोन सिरीज आहे. त्यामुळे जर तुम्हाला या सिरीजअंतर्गत येणारे फोन्स खरेदी करायचे असतील तर, तुम्हाला बजेट प्लॅन करणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या Samsung Galaxy S24 5G स्मार्टफोनवर तब्बल 12000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. चला तर मग जास्त वेळ जाणून घेऊयात Samsung Galaxy S24 5G वरील सवलत आणि सर्व तपशील-

Also Read: Google Pixel 9 Pro फोनवर तब्बल 10,000 रुपयांचा Discount, ‘या’ ठिकाणी होईल हजारो रुपयांची बचत

Samsung Galaxy S24 5G ची किंमत आणि ऑफर्स

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung Galaxy S24 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Amazon वर 74,999 रुपये इतकी आहे. सध्या हा फोन तुम्हाला मोठ्या सवलतीसह खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला हा फोन 12,000 रुपयांच्या डिस्काउंटसह केवळ 62,999 रुपयांना खरेदी करू शकता. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Samsung Galaxy S24 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S24 5G फोनमध्ये 6.2-इंच लांबीचा FHD+ Infinity-O डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080×2340 पिक्सेल आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रदान करण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Samsung Exynos 2400 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासोबतच, या फोनमध्ये Samsung Xclipse 940 GPU देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे.

Samsung Galaxy S24

याव्यतिरिक्त, Samsung Galaxy S24 5G फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. या सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, तुम्हाला 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10MP टेलिफोटो सेन्सर मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हा फोन 12MP फ्रंट कॅमेरासह येतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 4000mAh आहे, जी 25W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह उपलब्ध आहे. फोनमध्ये सर्कल टू सर्च, AI ट्रान्सलेशन इ. अनेक अनेक AI फीचर्स आहेत.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :