लेटेस्ट Samsung Galaxy S24 Ultra 5G वर मिळतोय प्रचंड Discount, ‘या’ ठिकाणी मिळतेय Best ऑफर

Updated on 04-Jun-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S24 सिरीज या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात लाँच झाली.

Samsung Galaxy S24 Ultra 5G स्मार्टफोनवर मोठे डिस्काउंट उपलब्ध

SAMSUNG फोनवर तब्बल 6000 रुपयांची सूट मिळणार आहे.

Samsung ची नवी फ्लॅगशिप Samsung Galaxy S24 सिरीज या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आली होती. आपणा सर्वांना माहितीच आहे की, या सीरिजमधील स्मार्टफोन्स महागड्या किंमत श्रेणीमध्ये मोडतात. मात्र, जर तुम्हाला हे स्मार्टफोन्स खरेदी करायचे असतील तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे. सध्या Samsung Galaxy S24 Ultra 5G स्मार्टफोनवर Amazon वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे.

Also Read: How to: WhatsApp वरील डिलीटेड मॅसेजेस कसे वाचायचे? फॉलो करा ‘ही’ सोपी प्रक्रिया| Tech News

Samsung Galaxy S24 Ultra 5G ची किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy S24 Ultra 5G स्मार्टफोनची किंमत 1,29,999 रुपयांपासून सुरू होते. या फोनची किंमत 1,39,999 रुपये आहे.ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon या SAMSUNG फोनवर 6000 रुपयांची सूट देत आहे. ही ऑफर HDFC बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यावर लागू होईल. त्याबरोबरच, तुम्ही 6,303 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील फोन खरेदी करू शकता. हा फोन टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम ग्रे आणि टायटॅनियम व्हायोलेट या तीन कलर ऑप्शन्ससह येतो. Buy From Here

Samsung Galaxy S24 Ultra 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S24 Ultra 5G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच लांबीचा क्वाड HD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. हा फोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy S24 Ultra 5G फोनमध्ये मागील बाजूस क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 200MP मुख्य कॅमेरा, 50MP कॅमेरा, 12MP कॅमेरा आणि 10MP चौथा सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, हा फोन एस पेन सपोर्टसह येतो. फोनला पाणी आणि धुळपासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी चार्जिंगसाठी USB Type-C पोर्टसह येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :