लेटेस्ट Samsung Galaxy S24 5G वर पहिल्यांदाच प्रचंड Discount उपलब्ध, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध 

 लेटेस्ट Samsung Galaxy S24 5G वर पहिल्यांदाच प्रचंड Discount उपलब्ध, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S24 5G हा कंपनीचा लेटेस्ट प्रीमियम स्मार्टफोन आहे.

Samsung Galaxy S24 5G सध्या प्रचंड सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S24 5G वरील ऑफर्स केवळ मर्यादित काळासाठी मिळेल.

नवीनतम Samsung Galaxy S24 5G हा कंपनीचा एक प्रीमियम फोन आहे, ज्यावर सध्या प्रचंड सूट दिली जात आहे. हा स्मार्टफोन कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये अनेक पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहेत, जे AI टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहेत. सध्या Samsung चा हा स्मार्टफोन कमीत कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. मात्र, हे ऑफर्स केवळ मर्यादित काळासाठी Samsung India च्या वेबसाईटवर लाईव्ह करण्यात आली आहे. जाणून घेउयात किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: त्वरा करा! Amazon GFF Sale दरम्यान iPhone मॉडेल्सवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध, पहा यादी

Samsung Galaxy S24 5G ची किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy S24 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे. तर, Samsung Galaxy S24 5G फोनच्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, सध्या हा फोन कंपनीच्या साइटवरून फक्त 62,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तर, 256GB मॉडेल 67,999 रुपयांना आणि 256GB मॉडेल 77,999 रुपयांना खरेदी करता येईल. या ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी तुम्हाला Samsung India च्या अधिकृत साईटला भेट द्यावी लागेल.

Samsung Galaxy S24

Samsung Galaxy S24 5G चे मुख्य तपशील

Samsung Galaxy S24 5G स्मार्टफोनमध्ये 6.2-इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Exynos 2400 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन तीन स्टोरेज मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB च्या स्टोरेज ऑप्शन्सचा समावेश आहे.

फोटोग्राफीसाठी, या Samsung Galaxy S24 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP, 10MP सेकंडरी आणि 12MP चा तिसरा कॅमेरा उपलब्ध आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, पॉवरसाठी हा स्मार्टफोन 4000mAh बॅटरीसह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo