अगदी निम्म्या किमतीत मिळतोय Samsung Galaxy S23 FE फोन, 2025 सुरु होताच मोठी Price Cut!
Samsung च्या फ्लॅगशिप फीचर्ससह Samsung Galaxy S23 FE स्वस्त फोन उपलब्ध
Flipkart वर Samsung Galaxy S23 FE फोनची किंमत 55% ने कमी
या हँडसेटमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्राथमिक सेन्सर उपलब्ध आहे.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने फ्लॅगशिप फीचर्ससह स्वस्त फोन Samsung Galaxy S23 FE भारतात लाँच केला होता. जर तुम्ही नववर्षात नवीन फोन खरेदी करायचा असेल तर, आम्ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन घेऊन आलो आहोत. प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart ग्राहकांना सॅमसंगच्या विविध व्हेरियंटवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. मात्र, सध्या सर्वात मोठी ऑफर Samsung Galaxy S23 FE वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहा ऑफर्स-
Also Read: Best Offers! 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo V40 5G वर मिळतोय 7000 रुपयांचा सुपर Discount
Samsung Galaxy S23 FE चे किंमत आणि ऑफर्स
2025 च्या सुरुवातीला कंपनीने Samsung Galaxy S23 FE फोनवर मोठी कपात केली आहे. Samsung Galaxy S23 FE फोनच्या 256GB व्हेरिएंटची किंमत 84,999 रुपये इतकी आहे. Flipkart ने या फोनची किंमत 55% ने कमी केली आहे. या सवलतीसह तुम्ही आता फक्त 37,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्ही हा फोन निम्म्या किमतीत खरेदी करण्यास सक्षम असाल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यावर तुम्हाला या फोनवर 5% कॅशबॅक मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Samsung Galaxy S23 FE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S23 फॅन एडिशन मॉडेलमध्ये 6.4 इंच लांबीचा डायनॅमिक फुलएचडी+ AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये इन-हाउस Exynos 2200 प्रोसेसर उपलब्ध आहे. या किमतीच्या श्रेणीतील हा एक उत्तम स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये तुम्ही रोजच्या कामासह मल्टीटास्किंग करू शकता.
फोटोग्राफीसाठी, हँडसेटमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्राथमिक सेन्सर, 12MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 8MP टेलिफोटो सेन्सर आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 10MP फ्रंट कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi, GPS, NFC आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटीचाही सपोर्ट आहे. तसेच, धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधासाठी हा फोन IP68 रेटिंगसह येतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile