अनेक AI फीचर्ससह सज्ज Samsung Galaxy S23 FE च्या किमतीत मोठी घसरण, Amazon सेलमध्ये भारी ऑफर्ससह उपलब्ध
नवीन Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोन नुकतेच भारतीय बाजारात लाँच
नवा फोन लाँच होताच मागील Samsung Galaxy S23 FE अतिशय स्वस्त दरात खरेदीसाठी उपलब्ध
Amazon GIF सेलदरम्यान तुम्हाला Samsung Galaxy S23 FE प्रभावी किमतीत खरेदी करता येईल.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने नुकतेच भारतीय बाजारपेठेत आपला नवीन Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोन लाँच केला आहे. नवा फोन लाँच होताच आता त्याचे मागील मॉडेल Samsung Galaxy S23 FE अतिशय स्वस्त दरात खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. इ-कॉमर्स साईट Amazon वर लाईव्ह असलेल्या Great Indian Festival सेल ही डील मिळत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Samsung Galaxy S23 FE ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Samsung Galaxy S23 FE वरील ऑफर्स
Samsung Galaxy S23 FE सध्या Amazon वर 29,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. या फोनवर 63% च्या फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध आहे. ही ऑफर फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अतिरिक्त बँक ऑफरसह या स्मार्टफोनची प्रभावी किंमत 27,999 रुपयांपर्यंत खाली जाऊ शकते. जे शक्य तितक्या कमी किमतीत फ्लॅगशिप Samsung स्मार्टफोन खरेदी करू पाहत आहेत, त्या युजर्ससाठी हा एक अप्रतिम स्मार्टफोन आहे. Buy From Here
Samsung Galaxy S23 FE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S23 FE फोनमध्ये 6.4 इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन 4nm वर आधारित ऑक्टा-कोर Exynos 2200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासोबतच हे IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंटसह येते. Samsung Galaxy S23 FE आयकॉनिक डिझाइनसह सादर केले गेले आहे.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये प्रो-ग्रेड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP उच्च-रिझोल्यूशन लेन्स उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात अल्ट्रा-वाइड लेन्ससह 12MP सेन्सर आणि 8MP टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 10MP फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी मिळणार आहे.
डिस्क्लेमर: या लेखात एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile