सेलदरम्यान तुम्हाला हा फोन 10,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल.
तुम्ही हा स्मार्टफोन Flipkart वरून खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.
Flipkart वर बिग बचत डेज सेल सुरु आहे, या सेलदरम्यान तुम्ही महागडे स्मार्टफोन्स अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S23 FE मॉडेलवरील ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. सेलदरम्यान तुम्हाला हा फोन 10,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy S23 FE वरील सर्व ऑफर्स-
Samsung Galaxy S23 FE फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 54,999 रुपये आहे. SAMSUNG Galaxy S23 FE वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, HDFC बँक कार्डद्वारे फोनवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या डिस्काउंटनंतर हा स्मार्टफोन 44,999 रुपयांना खरेदी करता येईल. येथून खरेदी करा
Samsung Galaxy S23 FE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
SAMSUNG Galaxy S23 FE मध्ये 6.4 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Samsung Exynos 2200 प्रोसेसर देण्यात आला आहे. Exynos 2200 उत्कृष्ट उर्जा कार्यक्षमता प्रदान करते आणि गेमर्सना अधिक काळ अधिक चांगले खेळण्यास सक्षम करते. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 256GB स्टोरेज ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
SAMSUNG Galaxy S23 FE फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. यात 12MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.