Samsung Galaxy S23 सिरीज ही कंपनीची फ्लॅगशिप सिरीज आहे.
तुम्ही Samsung Galaxy S23 फोन थेट 9000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करू शकता.
हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
Samsung Galaxy S23 सिरीज ही कंपनीची फ्लॅगशिप सिरीज आहे. ही सिरीज तुम्हाला खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट जास्त असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या स्मार्टफोनसाठी ऑफर्स शोधात असाल तर, हीच योग्य वेळ आहे. आता तुम्ही Samsung Galaxy S23 फोन थेट 9000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करू शकता. ही सवलत तुम्हाला Amazon वर देण्यात येत आहे. चला तर मग बघुयात ऑफर्स आणि सर्व तपशील-
Samsung Galaxy S23 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Samsung Galaxy S23 5G फोनची किंमत Amazon वर 64,999 रुपये आहे. Samsung Galaxy S23 5G वरील डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 9000 रुपयांची वेगळी सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर तुम्ही ते 55,999 रुपयांना खरेदी करू शकता. येथून खरेदी करा
Samsung Galaxy S23 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S23 5G फोनमध्ये 6.1 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Snapdragon 8 Gen 2 मोबाइल प्लॅटफॉर्म खरोखरच विलक्षण अनुभव सक्षम करण्यासाठी संपूर्ण बोर्डवर ग्राउंडब्रेकिंग AI सह हुशारीने इंजिनिअर केलेले आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट आहे.
फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy S23 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल, ज्यासह तुम्ही अप्रतिम फोटो क्लिक करण्यास सक्षम असाल. यात 10MP सेकंडरी कॅमेरा आणि 12MP तिसरा कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 12MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवरसाठी यामध्ये 3900mAh ची बॅटरी आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.