Price Cut! प्रीमियम फोन Samsung Galaxy S23 झाला तब्बल 18000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
Samsung Galaxy S23 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध
Samsung.com वर मिळतोय तब्बल 18,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट
Samsung Galaxy S23 प्रीमियम मोबाइल Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह येतो.
Samsung Galaxy S23: साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चा प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S23 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. या फोनवर तुम्हाला तब्बल 18,000 रुपयांची पूर्ण सूट मिळेल. यावर बँक ऑफर्स आणि EMI पर्यायही उपलब्ध आहेत. म्हणूनच जर तुम्ही फ्लॅगशिप डिव्हाइस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही ऑफर खास तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या नवीन किंमत आणि सर्व फीचर्स-
Also Read: नव्या स्टोरेज व्हेरिएंटसह Realme P1 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व डिटेल्स
Samsung Galaxy S23 ची नवी किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy S23 5G चा 128GB व्हेरिएंट Samsung.com वर 64,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. मात्र, लक्षात घ्या की चेकआउटच्या वेळी कंपनी फोनवर तब्बल 18,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. त्यानंतर तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 46,999 रुपयांना मिळेल. एवढेच नाही तर, Flipkart वर देखील हा फ्लॅगशिप फोन 46,999 रुपयांना सूचिबद्ध आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सॅमसंग वेबसाइट आणि फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर EMI आणि फुल-स्वाइप पेमेंटवर 10% सूट देखील मिळेल. ही सूट Samsung Axis बँक कार्डद्वारे दिले जात आहे. SAMSUNG Galaxy S23 5G च्या 256GB मॉडेल 51,999 रुपयांना उपलब्ध आहे.
Samsung Galaxy S23 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S23 मध्ये 6.1-इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा प्रीमियम मोबाइल Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह येतो. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 मिळेल. तर, पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP68 रेटिंग देखील देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy S23 मध्ये तुम्हाला 50MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. तर समोर 12MP चा सेल्फी सेन्सर मिळणार आहे. पॉवरसाठी, हा डिव्हाइस 3,900mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. तर, चार्जिंगसाठी 25W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile