लोकप्रिय फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S23 5G वर जबरदस्त Discount, होणार हजारो रुपयांची बचत

Updated on 16-Aug-2024
HIGHLIGHTS

Samsung चा फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy S23 स्वस्त किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध

Samsung Galaxy S23 5G स्मार्टफोन जवळपास अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी

विशेष म्हणजे Samsung Galaxy S23 5G स्मार्टफोन त्याच्या उत्कृष्ट कॅमेरा आणि अप्रतिम कामगिरीसाठी ओळखला जातो.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. Samsung च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना भारतात मोठी पसंती दर्शवली जाते. दरम्यान, Samsung च्या चाहत्यांसाठी एक उत्तम संधी आहे. सध्या Amazon India वर Samsung चा फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy S23 स्वस्त किंमतीत खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या हा फोन तुमच्या खिशाला परवडेल, अशा किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Also Read: WhatsApp स्टेटससाठी आले महत्त्वाचे अपडेट! संपर्कांशी कनेक्ट राहणे आता झाले सोपे, वाचा डिटेल्स

Samsung Galaxy S23 5G वरील ऑफर्स

सध्या Amazon India वर Samsung Galaxy S23 5G स्मार्टफोन 45% च्या डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन फक्त 52,700 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. मात्र, या फोनची MRP सुमारे 95,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Axis Bank क्रेडिट कार्डवर या फोनवर 1000 रुपयांची झटपट सूट देखील मिळेल. एवढेच नाही तर, एक्सचेंज ऑफर व्यतिरिक्त तुम्हाला या फोनवर बँक ऑफर देखील मिळत आहेत. येथून खरेदी करा

Samsung Galaxy S23 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S23 5G फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. या फोनच्या डिस्प्लेवर गोरिला ग्लास व्हिक्टस 2 सपोर्ट आणि 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. या प्रोसेसरसह तुम्ही गेमिंगपासून ते मल्टीटास्किंगपर्यंत सर्व काही अगदी आरामात करण्यास सक्षम असाल.

त्याबरोबरच, विशेष म्हणजे स्मार्टफोन त्याच्या उत्कृष्ट कॅमेरा आणि अप्रतिम कामगिरीसाठी ओळखला जातो. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 12MP सेकंडरी कॅमेरा आणि OIS सह दुसरा 10MP कॅमेरा आहे. याशिवाय, या फोनमध्ये 12MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही फोनसह 30 FPS वर 8K व्हिडिओ देखील शूट करू शकता. एवढेच नाही तर, फोनमध्ये 3900mAh बॅटरी आहे. सिंगल चार्जवर हा फोन संपूर्ण दिवस टिकेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :