Samsung चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S23 5G स्मार्टफोन नेहमीच बातम्यांमध्ये येत असतो. हा स्मार्टफोन मागील वर्षी लाँच झाला असून भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनला त्याच्या पॉलिश फिनिश आणि OneUI 6.1 वर आधारित सॉफ्टवेअरमुळे अजूनही खूप मागणी आहे. हा स्मार्टफोन सध्या भारतात फक्त 44,999 रुपयांना खरेदी करता येईल. लाँच झाल्यानंतर हा फोन सध्या आतापर्यंतच्या कमी किमतीत उपलब्ध आहे. बघुयात ऑफर्स-
सध्या Samsung Galaxy S23 5G वर ऑफर्सचा प्रचंड वर्षाव सुरु आहे. फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या Flipkart वर 64,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. हा स्मार्टफोन त्याच्या मूळ किमतीपेक्षा संपूर्ण 25,000 रुपयांच्या सवलतीसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, तुम्ही हा स्मार्टफोन तुमच्या कार्टमध्ये जोडून खरेदी केल्यास, ई-कॉमर्स कंपनी 10,000 रुपयांची सूट देत आहे.
याव्यतिरिक्त, बँक ऑफर्स देखील फोनवर मिळत आहेत. तुम्हाला HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. त्यानंतर, या हँडसेटची किंमत तब्बल 44,999 रुपयांपर्यंत खाली येते. वरील सर्व ऑफर्ससह तुम्ही या फोनवर खूप मोठी बचत करू शकता. येथून खरेदी करा
Samsung च्या या मागील फ्लॅगशिपमध्ये 6.1-इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. उत्तम कार्यक्षमतेसाठी, फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटसह सुसज्ज आहे. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि तब्बल 256GB पर्यंत स्टोरेज आणि उत्कृष्ट GPU सह जोडलेले आहे.
या फोनचा कॅमेरा सेटअप देखील प्रसिद्ध आहे. Samsung Galaxy S23 5G हँडसेट ट्रिपल-कॅमेरा सेटअप ऑफर करतो. ज्यामध्ये 50MP मुख्य लेन्स, 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलिफोटो लेन्स आणि 120-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 12MP अल्ट्रावाइड लेन्स समाविष्ट आहेत. फोनच्या फ्रंटमध्ये आकर्षक सेल्फीसाठी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे, जो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 3900mAh बॅटरी आहे, जी 25W जलद चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला समर्थनासह येते.