Samsung Galaxy S22 सीरिजच्या स्मार्टफोन्सवर 10 हजार रुपयांची सवलत, खरेदीसाठी हीच योग्य वेळ

Updated on 17-May-2023
HIGHLIGHTS

स्कीमअंतर्गत Samsung Galaxy S22 सिरीज स्मार्टफोन्स उपलब्ध

कंपनीची ही स्कीम आज 17 मे पासून सुरु झाली असून 26 मे पर्यंत

Samsung Galaxy S22 आणि S22 Ultra वर 10 हजारांपर्यंत सूट

Samsung Galaxy S22 सिरीज ही भारतात लोकप्रिय सिरीज आहे. या सिरीजमधील स्मार्टफोन्स डिझाईन, फीचर्स आणि स्पेक्सच्या बाबतीत खूप जबरदस्त आहेत. पण यासोबतच हे स्मार्टफोन्स एक्सपेन्सिव्ह देखील आहेत. त्यामुळे हे स्मार्टफोन अफोर्ड करणे प्रत्येकाला शक्य नाही. मात्र, तरीही तुम्हाला हे स्मार्टफोन्स हवे असतील, तर हीच योग्य वेळ आहे. कारण कंपनी एका स्कीमअंतर्गत Samsung Galaxy S22 आणि S22 Ultra वर 10 हजारांपर्यंत सूट मिळत आहे.

Samsung स्मार्टफोन्स ऑफर

Samsung Galaxy S22 सीरीजवर स्कीम कंपनीने 10 दिवसांसाठी सादर केली आहे. ही स्कीम आज 17 मे पासून सुरु झाली असून 26 मे पर्यंत चालणार आहे. या 10 दिवसांमध्ये वरील दोन्ही मोबाईल फोन अतिरिक्त सवलतीने खरेदी करता येतील. मात्र, एक लक्षात घ्या की, सॅमसंग स्मार्टफोनची ही ऑफर फक्त ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे.

Samsung Galaxy S22 Ultra वरील ऑफर्स

हे स्मार्टफोन या सिरीजमधील सर्वात मोठे मॉडेल आहे. Galaxy S22 Ultra वर 7,000 रुपयांची सूट जाहीर केली आहे. ही सूट फोनच्या 12GB रॅम + 256GB मेमरी आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेज वेरिएंटवर देण्यात आली आहे.

या फोनचा 12GB + 256GB व्हेरिएंट सध्या 1,02,999 रुपयांना उपलब्ध आहे. जो ऑफरनंतर 95,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तर, फोनच्या 12GB + 512GB वेरिएंटची किंमत 1,11,999 रुपये आहे. परंतु सॅमसंग ऑफरमध्ये तो 1,04,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Samsung Galaxy S22 वरील ऑफर्स

या स्कीमअंतर्गत कंपनी Samsung Galaxy S22 स्मार्टफोनवर थेट 10,000 रुपयांची सूट देत आहे. ही ऑफर फक्त फोनच्या 8GB रॅम + 128 GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. या वेरिएंटची किंमत 52,999 रुपये आहे, पण ऑफरमध्ये तो 42,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :