Best Offer: लोकप्रिय Samsung Galaxy S22 5G फोनवर तब्बल 50 हजार रुपयांची सूट, ही Special डील अजिबात चुकवू नका

Updated on 22-Apr-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S22 5G फोन फ्लिपकार्टवर प्रचंड Discountसह उपलब्ध

Flipkart वर Month end mobiles fest sale मध्ये स्मार्टफोन मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे.

हा स्मार्टफोन तब्बल 49,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध

Samsung ची सर्वात प्रसिद्ध Samsung Galaxy S22 सिरीज भारतीय ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या सिरीजमधील फोन महागडे असल्यामुळे हा फोन खरेदी करायचे म्हटल्यास सामान्य माणसाला सर्वात आधी खिसा तपासावा लागतो. मात्र, तरीही तुम्ही हा फोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर Samsung Galaxy S22 5G सध्या प्रचंड तब्बल 50 हजार रुपयांच्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्पेशल डीलबद्दल सविस्तर तपशील-

हे सुद्धा वाचा: Realme P1 5G सिरीजची आज भारतात पहिली सेल, बेस्ट ऑफर्ससह Affordable स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News

SAMSUNG GALAXY S22

Samsung Galaxy S22 5G फोनवरील डिस्काउंट

Samsung Galaxy S22 5G फोनचा बेस 8GB RAM + 128GB व्हेरिएंट प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर 85,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. ऑफरबद्दल बोलायचे तर, हा फोन सध्या फक्त 36,999 रुपयांमध्ये Flipkart Month end mobiles fest sale मध्ये तब्बल 49,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, HDFC बँकेच्या कार्डद्वारे फोनवर 1250 रुपयांची वेगळी सूटही उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy S22 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S22 स्मार्टफोनमध्ये 6.1 इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S22 5G फोन दोन स्टोरेज ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy S22 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. यात 10MP सेकंडरी आणि 12MP तिसरा कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 3700mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यासह USB टाइप-C चा सपोर्ट देखील मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :